वाहनधारकांना मास्क वाटून महानगर पालिकेचा निषेध
By Admin | Updated: October 29, 2016 00:58 IST2016-10-29T00:31:44+5:302016-10-29T00:58:55+5:30
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर ते पुंडलिक राऊत स्मृती चौकापर्यंतचा रस्ता सहा महिन्यांपासून धुळीच्या साम्राज्याखाली आला आहे.

वाहनधारकांना मास्क वाटून महानगर पालिकेचा निषेध
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर ते पुंडलिक राऊत स्मृती चौकापर्यंतचा रस्ता सहा महिन्यांपासून धुळीच्या साम्राज्याखाली आला आहे. शुक्रवारी युवकांनी धुळीपासून नागरिकांना संरक्षण मिळावे, यासाठी व मनपाने तातडीने रस्ता करावा, हे सूचित करण्यासाठी वाहनचालकांना मास्कचे वाटप केले. धुळीमुळे नागरिकांना अॅलर्जी आणि श्वसनाचे आजार जडण्यास सुरुवात झाली असून, परिसरातील क्लिनिकमध्ये नाक आणि घशांचे आजार असलेले रुग्ण वाढले आहेत.
गेल्या आठवड्यात आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्या रस्त्यावरील धूळ अनुभवली होती. आठ दिवसांत पुण्याहून त्या रस्त्याचे डिझाईन येईल. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल, असा शब्द आयुक्तांनी नागरिकांना दिला होता. आठ दिवस उलटले असून, त्या रस्त्याचे काम होत नसल्यामुळे मास्कचे वाटप करून युवकांनी पालिकेचा निषेध केला. गजानन महाराज रोड येथील रस्त्याचे काम न झाल्याने येथून जाणाऱ्या वाहनचालक, नागरिकांना धुळीतून जावे लागत आहे. तो रस्ता म्हणजे नरकयातना देणारा ठरतो आहे.
प्रशासनाने जनतेला यातना देण्याचा प्रकार कुठे तरी थांबले पाहिजे. रस्त्याचे काम करण्याचा विचार प्रशासन करणार की नाही. लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांची धुळीतून सुटका व्हावी. अक्षरश: त्या रस्त्यावर धूळच धूळ असून, बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांना त्वचा आणि श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे. असे मनपाच्या विरोधात मास्क वाटून गांधीगिरी करणारे युवक राहुल इंगळे, अक्षय ताठे, महेश ठोंबरे,राहुल नरोडे, छावाचे सचिन मिसाळ यांनी नमूद केले.