मर्जीतील ठेकेदारांना पाण्याचा ठेका देण्याच्या हालचाली

By Admin | Updated: November 30, 2015 23:32 IST2015-11-30T23:07:27+5:302015-11-30T23:32:55+5:30

बीड : पुढील वर्षाचे पिण्याच्या पाण्याचे टेंडर देण्याची प्रक्रीया अंतीम टप्यात आहे. यामध्ये ओडो मीटर (कि़मी. प्रमाणपत्र) ला सुट देत टेंडर ओपन केल्याचे आरोपही झाले.

Movement for Water Contracting Contractors | मर्जीतील ठेकेदारांना पाण्याचा ठेका देण्याच्या हालचाली

मर्जीतील ठेकेदारांना पाण्याचा ठेका देण्याच्या हालचाली


बीड : पुढील वर्षाचे पिण्याच्या पाण्याचे टेंडर देण्याची प्रक्रीया अंतीम टप्यात आहे. यामध्ये ओडो मीटर (कि़मी. प्रमाणपत्र) ला सुट देत टेंडर ओपन केल्याचे आरोपही झाले. आता टेंडर प्रक्रीया अंतीम टप्यात असून मर्जितील ठेकेदारांना ठेका देण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी जोर लावला असल्याचे विश्वासनीय सुत्रांनी सांगितले.
टेंडर प्रक्रीयेत मागविण्यात आलेले दर लक्षात घेवून अथवा ज्या ठेकेदाराने दर कमी लावलेले आहेत. त्यांना ठेका देणे अपेक्षीत आहे. ठेकेदारांकडून मंत्री, आमदारांचे शिफारस आणून ठेका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या पाणी पुरवठ्याची टेंडर प्रक्रीया अंतीम टप्यात असून ठेकेदारांबरोबरच काही अधिकारी देखील मर्जीतल्या ठेकेदारांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Movement for Water Contracting Contractors