अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार युवक ठार; जालना रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:15 IST2021-01-02T17:12:35+5:302021-01-02T17:15:33+5:30
केंब्रीज चौकाजवळ एका मोपेडस्वार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला काही नागरिकांना आढळून आला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार युवक ठार; जालना रोडवरील घटना
औरंगाबाद: जालनारोडवरील कॅब्रीजचौकाजवळ अपघातात २७ वर्यीय युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. समीर हनिफ शेख (२७,रा. शाहनगर मसनतपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री केंब्रीज चौकाजवळ एका मोपेडस्वार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला काही नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यास तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तो मोपेडवरून स्वत:च पडला की, त्याला कोणते वाहन धडकून निघून गेले, याविषयी पोलीस शोध घेत आहेत.
डोक्याला गंभीर मार
समीरचा अपघात नेमका कसा झाला ? तो स्वतःहून पडला की, त्याला वाहन उडवून गेले, याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस अधिक तपास करत आहेत. ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे. पोलीस नाईक बापुराव बाविस्कर अधिक तपास करीत आहेत.