शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'आई, पोहोचल्यावर सांग, मी येतो', फोननंतर पहाटे तिचा मृतदेहच पाहण्याची मुलावर आली वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:10 IST

एका मैत्रिणीवर अंत्यसंस्कार सुरू असताना दुसऱ्या मैत्रिणीची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली; हुंदके, आक्रोशाने वाळूज हळहळले

छत्रपती संभाजीनगर : मंगळवारी दुपारी सिहोर येथे दर्शन झाल्यानंतर लता राजू परदेशी (४७), आशा राजू चव्हाण (४०, दोघी रा. वाळूज) दोघींनी मुलांना कॉल करून दर्शन चांगले झाल्याचे कळवले. रात्री ९ वाजता रेल्वे एका थांब्यावर असताना आशा यांनी मोठा मुलगा पवनला कॉल करून त्याला वडील, लहान भावासह जेवणाविषयी विचारपूस केली. पवनने आईला 'शहरात पोहोचल्यावर कॉल कर, मी तुला घ्यायला येतो', असे सांगितले होते. पहाटे उठून घ्यायला जाण्याच्या तयारीत तो होता. मात्र ५ वाजता आईच्या अपघाताचा काॅल आला. थरथरणाऱ्या अंगाने पवन घाटीत दाखल झाला. तेव्हा आठ तासांपूर्वी आनंदाने बोललेल्या आईचा मृतदेह पाहण्याची वेळ त्याच्यावर आली. त्याच्या आक्रोशाने घाटीतील उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.

बेजबाबदार ट्रॅव्हल्सचालक व त्याच्या सहकाऱ्याच्या एका चुकीमुळे उत्साहात दर्शन करून शहरात परतलेल्या आशा व लता यांच्यावर काळाने घाला घातला. वाळूज व नगर नाक्यावर प्रवाशांना उतरविल्यानंतरही चालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (२९, रा. बिदर, कर्नाटक) व क्लिनर राज सुनील बैरागी (२०, रा. मध्यप्रदेश) यांनी डिक्कीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले कसे नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तो बऱ्याच अंतरापासून तसाच उघडा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. मात्र, पहाटेची वेळ असल्याने तो दरवाजा अन्य वाहनाला धडकला नाही. पंचवटी चौक सारख्या छोट्या रस्त्यावरही चालक सुसाट वेगात जाताना तो रिक्षाला लागून अपघात झाला.

दोन कुटुंब आईच्या मायेपासून पोरकीआशा यांचे पती चालक आहेत. त्यांचा लहान मुलगा दहावीत असून मोठा मुलगा पवन महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तर परदेशी यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची मोठी मुलगी विवाहित असून २९ वर्षांच्या मुलाचे वाळूजमध्ये वेल्डिंग वर्कशॉप आहे. चार वर्षांच्या अंतराने आई-वडील दोघांच्या प्रेमाला तो पारखा झाला. घाटीत दोघींच्या मुलांच्या आक्रोशाने सर्वच हळहळले.

एकीवर अंत्यसंस्कार, दुसरीची अंत्ययात्रा आलीएकाच परिसरात राहत असल्याने आशा, लता दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींवर बुधवारी सायंकाळी वाळूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच आशा यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत दाखल झाली. त्यावेळी दोघांच्या कुटुंबाचे हुंदके, आक्रोशाने संपूर्ण वाळूज परिसर हळहळला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's last call: Son awaited, found her lifeless instead.

Web Summary : A son's anticipation turned to grief as a fatal accident claimed his mother's life after a pilgrimage trip. Negligence by the travel company is suspected, leaving two families devastated. The community mourns the tragic loss of two close friends.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर