शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन ठिकाणी महिलांचा विनयभंग

By admin | Updated: June 29, 2014 00:39 IST

उस्मानाबाद : खुरपून काढलेले गवत बांधावर टाकण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : खुरपून काढलेले गवत बांधावर टाकण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास कामेगाव शिवारात घडली़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कामेगाव येथील सत्यवान नामदेव गायकवाड याने ३ मार्च रोजी गावातील एका महिलेच्या घरात घुसून अश्लिल भाषेत बोलत विनयभंग केला़ तसेच मंगळवारी दुपारी ती गावच्या शिवारातील एका शेतात खुरपण्याच्या कामासाठी गेली होती़ खुरपलेले गवत बांधावर टाकण्यासाठी ती गेली असता तिचा गायकवाड याने विनयभंग केला़ याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गायकवाड याच्याविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास हेकॉ ए़ आऱ जाधव हे करीत आहेत़शिराढोण : तरूणीस शिवीगाळ करीत घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी दुपारी देवधानोरा (ताक़ळंब) येथे घडली़पोलिसांनी सांगितले की, देवधानोरा येथील एक युवती गुरूवारी दुपारी तिच्या घरात बसली होती़ त्यावेळी माणिक झुंबर वाघमारे, नानासाहेब जयदत्त वाघमारे, झुंबर बळीराम वाघमारे, जयदत्त बळीराम वाघमारे यांनी तिस शिवीगाळ करीत घरात घुसून विनयभंग करून मारहाण केली़ या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़भूम : महिलेचा हाताला धरून मुलाला जिवे मारण्याची व स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्याविरूध्द भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शुक्रवारी सकाळी बावी (ता़भूम) येथे घडली़पोलिसांनी सांगितले की, बावी येथील दादा बबन कांबळे याने गावातील एका महिलेच्या घरात घुसून तिच्या हाताला धरून विनयभंग केला़ तसेच तिच्या मुला जीवे मारण्याची व स्वत: घरासमोर आत्महत्या करण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कांबळे याच्याविरूध्द भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ मुळे हे करीत आहेत़