शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महिला सदस्याचा ग्रामसेवकाकडून विनयभंग

By admin | Updated: September 6, 2015 23:59 IST

बीड : तेराव्या वित्त आयोगातून झालेली कामे बोगस आहेत, अशी तक्रार ग्रामसेवकाकडे करण्यासाठी गेलेल्या एका ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली

बीड : तेराव्या वित्त आयोगातून झालेली कामे बोगस आहेत, अशी तक्रार ग्रामसेवकाकडे करण्यासाठी गेलेल्या एका ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली. ग्रामसेवकानेही सदस्याच्या पतीने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद रविवारी चव्हाट्यावर आला आहे.शिरूर तालुक्यातील येळंब ग्रामपंचायतीने तेराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याची तक्रार चार सदस्यांनी केली होती. यापैकी एका महिला सदस्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात आल्यानंतर ग्रामसेवक एम. एम.जाधव यांना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या महिला सदस्याने केलेल्या तक्रारीनुसार जाधव यांनी उद्धटपणे वागणूक देत कार्यालयातून बाहेर ढकलत विनयभंग केला असल्याचे म्हटले आहे. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीनुसार बोगस कामे द्या, अशी मागणी या सदस्याने केली होती आणि यातूनच तिच्या पतीने कार्यालयात मारहाणीची तक्रार दिली आहे.दरम्यान गावकऱ्यानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून ग्रामसेवकाने दाखल केलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. ग्रासेवक संघटनेने जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तातडीने मागे घेतला नाही तर सोमवारपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)