बेपत्ता महिलेचा चिमुकलीसह विहिरीत आढळला मृतदेह; नातेवाईकांचा हत्येचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 19:19 IST2020-02-17T15:32:36+5:302020-02-17T19:19:20+5:30
महिलेवर अत्याचार करून हत्येचा नातेवाईकांचा आरोप

बेपत्ता महिलेचा चिमुकलीसह विहिरीत आढळला मृतदेह; नातेवाईकांचा हत्येचा आरोप
सिल्लोड: तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी एका महिलेचा तिच्या मुलीसह मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिला शनिवारपासून बेपत्ता होती. दरम्यान, ही आत्महत्या नसून अत्याचारकरून महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.
दुपारी 2 वाजता दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उशिरा आल्याने गावकऱ्यांनी रुग्णवाहीकेवर दगड फेककरून अंतिला परत पाठवले. यानंतर खाजगी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, शवविच्छेदन सिल्लोडला न करता औरंगाबाद येथे इन कॅमेरा करावे अशी मागणी करून नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला आहे.