शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दोन पंडितांचे मनोमिलन

By admin | Updated: October 3, 2014 00:34 IST

गेवराई मतदारसंघात दोन पंडितांमधील राजकीय वैर जिल्ह्याच्या राजकारणाला गेली पंचवीस वर्षापासून परिचित आहे. पंचायत समितीचे सभापतीपद काकांनी नाकारले म्हणून

गेवराई मतदारसंघात दोन पंडितांमधील राजकीय वैर जिल्ह्याच्या राजकारणाला गेली पंचवीस वर्षापासून परिचित आहे. पंचायत समितीचे सभापतीपद काकांनी नाकारले म्हणून त्यांच्यापासून दुरावलेल्या बदामराव पंडित या त्यांच्या पुतण्याने स्वत:च्या बळावर आपले राजकीय करीअर घडविले. त्यानंतर काका शिवाजीराव पंडित आणि चुलत भाऊ अमरसिंह पंडित यांच्या विरोधातही बदामराव यांनी निवडणूक लढविली. बदामराव आणि अमरसिंह पंडित यांच्यातील राजकीय वैर वाढतच गेले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन पंडित मिळून प्रचारात उतरले आहेत. बदामराव पंडित हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. निवडणुकीत गोळाबेरीज करण्यासाठी सगळेच उमेदवार प्रयत्न करीत असतात. अशीच गोळाबेरीज आता दोन पंडितांनी केली असली तरी या दोन्ही पंडितांच्या कार्यकर्त्यांना मात्र हे पचनी पडले आहे की नाही, हे निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षात गेवराई करांना दोन पंडित एकाच पक्षासाठी एकाच मंचावर कधीही दिसलेले नाहीत. मात्र हे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेले आहे. यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघातून भाजपाकडून उभे असलेले अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांच्या समोर आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाला पवार कसे पेलतात हे पहाणे आवश्यक आहे. आज तरी दोन पंडित व पवार मतदार संघातील वाड्या, वस्त्या, तांड्यावर प्रचार करत असल्याचे पहावयास मिळत आहे. काय होईल ते मतदानाच्या नंतरच कळेल.