शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम - महापौरांत खडाजंगी

By admin | Updated: May 19, 2015 00:54 IST

औरंगाबाद : मनपातील विरोधी पक्षनेता नियुक्तीच्या मुद्यावरून सोमवारी एमआयएमचे नगरसेवक आणि महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

औरंगाबाद : मनपातील विरोधी पक्षनेता नियुक्तीच्या मुद्यावरून सोमवारी एमआयएमचे नगरसेवक आणि महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पालिकेत विरोधी बाकावर एमआयएमचेच सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे कोणतीही सबब न सांगता विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका एमआयएमच्या नगरसेवकांनी घेतली. तर महापौरांनी नगरविकास खात्याचे पत्र आल्याशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी काही जणांनी तुम्ही एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहात, असा आरोप महापौरांवर केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. एमआयएमच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांची भेट घेतली. शिष्टमंडळात नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत २० दिवस होऊनही महापौरांनी निर्णय न घेतल्यामुळे शिष्टमंडळातील काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे दहाच सदस्य आहेत, तर आमचे २६ नगरसेवक आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर एमआयएमचाच अधिकार आहे. तरीही शासन आणि आयोगाकडे पत्रव्यवहार करून वेळ वाया का घालविला जात आहे, असा सवाल शिष्टमंडळातील सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर महापौरांनी काँग्रेसनेही पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यामुळे हा उशीर होत असल्याचे सांगितले. राज्यात एमआयएम हा नोंदणीकृत पक्ष नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाचशिष्टमंडळात एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी, नगरसेवक जमीर अहमद कादरी, गंगाधर ढगे, फेरोज खान, जहांगीर खान यांच्यासह पक्षाचे बहुतेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. महापौरांपुढे बाजू मांडण्यासाठी पक्षाच्या वतीने एका वकिलांना सोबत आणण्यात आले होते. या वकिलांनीच सुरुवातीला महापौरांपुढे एमआयएमचे म्हणणे मांडले. ४नियमात सर्वात मोठ्या विरोधी गटाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असे म्हटलेले आहे, त्यात पक्षाचा उल्लेख नाही, असे सांगितले. तसेच उल्हासनगर मनपात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा हायकोर्टाने त्यावर स्पष्ट निर्णय दिलेला आहे. त्यातही मोठ्या गटालाच पद देण्याचे निर्देश देण्यात आले होते, याचा दाखलाही त्यांनी दिला. एमआयएमच्या शिष्टमंडळात नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता; परंतु त्यात एकही महिला नगरसेविका नव्हती. त्याऐवजी त्यांचे पतीराजच हिरीरीने सहभागी झाले होते. त्यामुळे शिष्टमंडळात नगरसेवक पतीराजांचा भरणा अधिक दिसत होता.