शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती नसताना लाखोंची उधळपट्टी

By admin | Updated: August 25, 2014 01:40 IST

बीड : शासनाचा पैसा विकासाच्या नावाखाली कसा गडप केला जातो हे पहायचे असले तर केज तालुक्यातील विडा या गावाकडे पहा. या गावातील कल्याणवाडी व बुरंडवाडी

बीड : शासनाचा पैसा विकासाच्या नावाखाली कसा गडप केला जातो हे पहायचे असले तर केज तालुक्यातील विडा या गावाकडे पहा. या गावातील कल्याणवाडी व बुरंडवाडी या वस्तीत दलिताचे एकही घर नाही;पण येथे दलित वस्ती विकास योजनेचा सव्वासात लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. ‘हपापाचा माल गपापाला’ या म्हणीप्रमाणे स्वत:चेच ‘कल्याण’ करुन घेण्यात ‘पटाईत’ असलेल्या गावकारभाऱ्यांसह ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.विडा येथे कल्याणवाडी व बुरंडवाडी या दोन वस्तीत ७ लाख ३१ हजार ४२८ रुपये खर्च करुन विहीर व नळयोजना ही कामे दलित वस्ती विकासयोजनेतून करण्याचा घाट घातला होता. ११ जुलै २०११ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्याला तांत्रिक मान्यता बहाल केली. त्यानंतर जलव्यवस्थापन समितीच्या २७ जून २०११ रोजीच्या बैठकीत विषय क्र. सहा नुसार या कामाला मंजुरी मिळाली. तत्पूर्वी १ मे २०११ रोजी विडा ग्रामपंचायतीने हे काम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती.कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येथे कामेही सुरु झाली़ त्यानंतर तक्रारी आल्यानंतर जि़ प़ सीईओ राजीव जवळेकर यांनी चौकशी केली़ या चौकशीत बुरंडवाडी, कल्याणवाडी येथे मागासवर्गीय प्रवर्गाचे एकही घर नसल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी येथील नळजोडणी व विहिरीचे काम रद्द करण्यात आले़ त्यानंतर या कामासाठी खर्च केलेला व उपलब्ध करुन दिलेला निधी तात्काळ जमा करण्याचे आदेश जवळेकर यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव तसेच ग्रामसेवक यांना दिले़केवळ दोन लाखांचा निधी परत२९ जानेवारी २०१४ रोजी विडा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी २ लाख १३ हजार ७५० रुपये जिल्हा परिषदेकडे जमा केले़ मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषदेने समितीला सहा लाख ६८ हजार ९२८ हे अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन दिले होते तर लोकसहभागातून ६२ हजार ५०० रुपये जमा झाले होते़ एकूण सात लाख ३१ हजार ४२८ रुपये इतका निधी समितीकडे जमा होता़ (प्रतिनिधी)कल्याणवाडी, बुरंडवाडी येथे दलित वस्ती नसताना सात लाख ३१ हजार ४२८ रुपये नियमबाह्यरित्या खर्च करणे ही गंभीर बाब आहे़४त्यामुळे या प्रकरणी जबाबदार धरुन आपल्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी एफआयआर करण्यात का येऊ नये ? नियमबाह्य खर्च वसूल का करण्यात येऊ नये ? याच खुलासा आठ दिवसात द्यावा, अशी तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी २ आॅगस्ट २०१४ रोजी कारणे दाखवा नोटिसीद्वारे दिली आहे़४केज पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा विडा पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष विजय रामराव पटाईत, सचिव रमेश किसन दुनघव व तत्कालीन ग्रामसेवक बी़ एस़ शिंदे यांना ही नोटीस बजावली आहे़४मात्र या नोटिशीचा अद्यापही खुलासा केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले़