वस्तीशाळेवरील निमशिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:28:18+5:302014-05-21T00:47:43+5:30

नांदेड: वस्तीशाळेवरील निमशिक्षकांना शासनाने प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याचे आदेश बजावले असले तरी जिल्ह्यातील ३२६ निमशिक्षकांना मात्र अद्यापही नियुक्ती दिली नाही़

Midwives at the West Coast are still waiting for the appointment | वस्तीशाळेवरील निमशिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत

वस्तीशाळेवरील निमशिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत

 नांदेड: वस्तीशाळेवरील निमशिक्षकांना शासनाने प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याचे आदेश बजावले असले तरी जिल्ह्यातील ३२६ निमशिक्षकांना मात्र अद्यापही नियुक्ती दिली नाही़ परिणामी जिल्ह्यातील वस्तीशाळांवरील शिक्षक नियुक्ती आदेशासाठी जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि प्रशासनाकडे खेटे मारत आहेत़ वस्तीशाळेवरील निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत़ जिल्ह्यात जवळपास ३५० वस्तीशाळा असून या वस्तीशाळांवर ३२६ निमशिक्षक कार्यरत आहेत़ शासनाने २००९-१० पासून वस्तीशाळांना नियमित शाळा म्हणून मान्यता दिली आहे़ या शाळेवरील निमशिक्षकांना १५०० ते ३५०० रूपयांपर्यंत मानधन दिले जात होते़ या शिक्षकांना १ मार्च २०१४ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून कायमस्वरूपी शासनसेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत़ नांदेड जिल्ह्यात मात्र या आदेशाची अंमलबजावणी मात्र अद्यापही झाली नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील वस्तीशाळांवरील निमशिक्षक जिल्हा परिषदेत खेटे मारत आहेत़ कधी पदाधिकार्‍यांकडे तर कधी प्रशासनाकडे हे निमशिक्षक आपल्या मागण्या मांडत आहेत़ त्यात नियुक्ती आदेश देण्याची पहिली मागणी आहे़ तसेच निमशिक्षकांना नियुक्ती देताना जि़ प़ प्रशासनाने २०१३-१४ मध्ये ज्या शाळेवर निमशिक्षक म्हणून कार्यरत होते त्या निमशिक्षकांना त्याच शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून प्राधान्याने नियुक्ती करावी, २०१३-१४ मध्ये जे अतिरिक्त निमशिक्षक ज्या शाळेवर प्राथमिक शिक्षकाच्या रिक्त जागी कार्यरत होते त्यांनाही त्याच शाळेवर नव्याने प्राथमिक शिक्षक म्हणून पदस्थापना द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ वस्तीशाळेवरील निमशिक्षकांना नियुक्ती देण्याबाबतची संचिका तयार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़ संचिका तयार आहे तर मग ‘ब्रेक’ कुठे व का बसला हा प्रश्न निमशिक्षकांतून विचारला जात आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Midwives at the West Coast are still waiting for the appointment