५ लाखांत मिळणार म्हाडाचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 01:03 IST2016-06-22T00:51:08+5:302016-06-22T01:03:31+5:30

संजय देशपांडे , औरंगाबाद पंतप्रधान घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३,९४८ घरांच्या बांधकामांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.

MHADA's house to get 5 lakh | ५ लाखांत मिळणार म्हाडाचे घर

५ लाखांत मिळणार म्हाडाचे घर


संजय देशपांडे , औरंगाबाद
पंतप्रधान घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३,९४८ घरांच्या बांधकामांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. याअंतर्गत औरंगाबाद शहरात १,९५२ घरे बांधली जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान वगळता औरंगाबादेत पाच लाख रुपयांत ३०० ते ३२० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत देशातील एकही कुटुंब बेघर राहू नये, परवडणाऱ्या किमतीत त्याला घर उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान घरकुल योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेसाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली (पान २ वर)४
या योजनेंतर्गत औरंगाबादेतील सातारा, वळदगाव, पडेगाव, नक्षत्रवाडी आणि चिकलठाणा येथे घरे बांधली जातील.
४याठिकाणी असणाऱ्या शासकीय जमिनी नाममात्र दरात ताब्यात द्याव्यात, अशी मागणी म्हाडातर्फे करण्यात आली आहे.
४लातूर आणि जालना येथे म्हाडाकडे जमिनी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील घरकुलांची कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.

Web Title: MHADA's house to get 5 lakh