शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची सभा; के.चंद्रशेखरराव यांच्या भाषणाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:46 IST

सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षध्वज व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ‘अब की बार किसान सरकार’ हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे. या पक्षाची सभा २४ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील जबिंदा मैदानावर होत आहे. सभेला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ वा. सभा होणार असून मुख्यमंत्र्यांचे ४ वाजेच्या सुमारास विमानतळावर आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षध्वज व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. विमानतळ ते सभास्थळापर्यंत होर्डिंग्ज आहेत. गोल आकाराच्या होर्डिंग्जने शहरवासीयांचे लक्ष वेधले असून सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याची ग्वाही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. बीआरएसचे छोटे मोठे अनेक नेते, निरीक्षक, खासदार, आमदार सभेच्या नियोजनासाठी मागील आठवडाभरात पासून शहरात तळ ठोकून आहेत.

पन्नास माजी नगरसेवकांचा प्रवेशके. चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्रात बीआरएस वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याची सुरुवात त्यांनी नांदेडपासून केली. नांदेडमध्ये स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते, शेतकरी नेते तसेच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सुमारे पन्नास माजी नगरसेवक या सभेत प्रवेश घेणार असल्याचे बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी आ. जीवन रेड्डी यांनी सांगितले.

तेलंगणा मॉडेलच्या ४२५ योजना सांगणार आज होणाऱ्या बीआरएसच्या जाहीर सभेत बीआरएसचे सर्वेसर्वा व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तेलंगणा मॉडेलच्या ४२५ योजनांची माहिती देणार आहेत. रोज सात-आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्राने हे मॉडेल स्वीकारावे, असा आग्रह बीआरएसचा आहे.   

बीएसआर सभेसाठी वाहतुकीमध्ये बदलतेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची जाबिंदा मैदानावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली. सोमवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान शहानूरमियाँ दर्गा चौक ते गोदावरी टी पाॅईंट हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नागरिकांनी इतर मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद