शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी अभियंत्यांकडून ‘एमबी रेकॉर्ड’!

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

बीड : जिल्हा परिषदेंतर्गत बांधकाम विभागामार्फत झालेल्या कामांची मोजमाप पुस्तिका खाजगी अभियंत्यांकडून रेकॉर्ड केल्याची माहिती पुढे आली आहे़

बीड : जिल्हा परिषदेंतर्गत बांधकाम विभागामार्फत झालेल्या कामांची मोजमाप पुस्तिका खाजगी अभियंत्यांकडून रेकॉर्ड केल्याची माहिती पुढे आली आहे़ कारवाईच्या भीतीने जि़ प़ मधील अभियंत्यांनी नकार दिल्यामुळे काही गुत्तेदारांनी खाजगी अभियंत्यांचा आधार घेतला़ या माध्यमातून कोट्यावधी रूपयांच्या कामांची देयकेही अदा करण्यात आली आहेत़२०१४-१५ या वर्षामध्ये बांधकाम वर्ग १, २ विभागांसाठी प्रत्येकी ५० लाख रूपये इतक्या निधीची तरतूद मूळ अंदाजपत्रकात करण्यात आली होती़ मात्र जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून तरतुदीपेक्षा कितीतरी पटीने अधिक कामे करण्यात आली होती़ नेमकी कामे किती रूपयांची झाली ? किती कामांना प्रशासकीय मंजुरी आहे ? किती कामांची देयके अदा करण्यात आली आहेत ? या संदर्भातील कुठलीच माहिती बांधकाम विभाग तसेच वित्त व लेखा विभागामध्ये उपलब्ध नाही़ त्यामुळे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे़दरम्यान, प्रशासकीय मान्यता नसतानाही जिल्हा परिषदेत बनावट कार्यारंभ आदेशाच्या संचिकाद्वारे काहींनी कामे करून बिले उचलल्याचेही पुढे आले होते़ तत्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे यांनी या संदर्भातील अहवाल शासनाला पाठविला होता़ नंतर सीईओ राजीव जवळेकर यांनी नियमबाह्य कामे रद्द करण्याचे आदेश दिले होते़काही गुत्तेदारांनी नियमबाह्य कामांसाठी शाखा अभियंत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला़ मात्र या अभियंत्यांनी दाद न दिल्यामुळे गुत्तेदारांनी खाजगी अभियंत्यांना गाठून त्यांच्याकडून मोजमाप पुस्तिका तयार करून घेतल्या व त्या आधारेच थेट कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षऱ्या घेऊन बील उचलले़कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही़ त्यामुळे त्यांची बाजू कळाली नाही़ (प्रतिनिधी)