शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर शहर महानगरपलिकेचा आज ठरणार महापौर

By admin | Updated: November 12, 2014 00:25 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असून आज मतदान होणार आहे़ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असून आज मतदान होणार आहे़ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत हात उंच करून मतदान होईल़ काँग्रेसचे अख्तर शेख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली इंद्राळे यांच्यात महापौरपदासाठी लढत होत आहे़ तर काँग्रेसचे कैलास कांबळे व शिवसेनेचे सुनील बसपुरे यांच्यात उपमहापौरपदासाठी लढत होणार आहे़ काँग्रेसचे स्पष्टपणे बहुमत असलेल्या मनपात दोन्ही पदांवर काँग्रेसचा विजय निश्चित असला तरी विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने मतदान होत आहे़काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेवरून प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड़ गणेश पाटील यांनी बुधवारी होत असलेल्या लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर निवडीसाठी नगरसेवकांना व्हिप बजावण्याचे अधिकार शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांना दिले आहेत़ त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिलेले महापौरपदाचे उमेदवार अख्तर शेख व उपमहापौरपदाचे उमेदवार कैलास कांबळे यांनाच मतदान करण्यासाठीचा व्हिप अर्थात पक्षादेश शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, मनपातील काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी काँग्रेस नगरसेवकांना जारी केला आहे़ मनपात काँग्रेसचे एका अपक्षासह ५० सदस्य आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, शिवसेना ६ व रिपाइंचे दोन सदस्य आहेत़महापौर, उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ९़३० वाजता काँग्रेस भवन येथे माजीमंत्री आ़ दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे़ या बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख नगरसेवकांना मार्गदर्शन करतील़ त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक मनपा सभागृहात होणाऱ्या निवड सभेला जाणार आहेत़ मनपात काँग्रेसची एकहाती सत्ता असली तरी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होत असल्याने काळजी घेतली जात आहे़ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे़ प्रारंभी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर उमेदवार घोषित केले जातील़ १५ मिनिटे माघार घेण्यासाठी वेळ देण्यात येईल़ प्रारंभी महापौरपदासाठी व नंतर उपमहापौरपदासाठी हात उंचावून मतदान होईल़ राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपातील गटनेते मकरंद सावे यांनी मंगळवारी नगरसेवकांची बैठक घेऊन महापौरपदाच्या उमेदवार दिपाली राजेंद्र इंद्राळे व शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार सुनील बसपुरे यांना मतदान करण्याच्या सूचना केल्या आहेत़ बैठकीस नगरसेवक राजेंद्र इंद्राळे, शैलेश स्वामी, राहुल माकणीकर यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते़