दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम! सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ-खुलताबादला पर्यटकांची झुंबड; वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:36 IST2026-03-21T16:35:28+5:302026-03-21T16:36:12+5:30

दौलताबाद घाटात हजारो वाहने अडकली, सुट्टीचा आनंद ट्रॅफिकमध्ये विरला

Massive Traffic Jam in Daulatabad Ghat: Tourists Flocked to Ellora and Khultabad on Weekend; Long Queues Observed | दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम! सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ-खुलताबादला पर्यटकांची झुंबड; वाहनांच्या लांबच लांब रांगा

दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम! सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ-खुलताबादला पर्यटकांची झुंबड; वाहनांच्या लांबच लांब रांगा

खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर): शनिवार-रविवारची जोडून आलेली सुट्टी आणि रमजान ईदच्या सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर परिसरातील पर्यटन व धार्मिक स्थळांवर पर्यटकांचा महासागर लोटला आहे. मात्र, दौलताबाद देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी आणि भद्रा मारुती मंदिर परिसरात झालेल्या अलोट गर्दीमुळे दौलताबाद घाटात भीषण वाहतूक कोंडी झाली. दुपारी २ वाजेपासून सुरू झालेली ही समस्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत कायम होती, ज्यामुळे हजारो पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

दौलताबाद वेशीपाशी रस्ता ठरला अरुंद
दौलताबाद वेशी परिसरातील अत्यंत अरुंद रस्ता आणि अचानक वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी परराज्यातून आणि शहरातून आलेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या घाटात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः शनिवार असल्याने भद्रा मारुती मंदिर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

पोलिसांचे प्रयत्न ठरले अपुरे
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र पर्यटकांच्या अफाट गर्दीपुढे ही यंत्रणा हतबल ठरल्याचे दिसून आले. अनेक वाहनचालकांना तासन्तास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागले. "अशा सुट्टीच्या आणि सणासुदीच्या दिवसात प्रशासनाने आगाऊ नियोजन करणे गरजेचे आहे," अशी मागणी संतापलेल्या पर्यटकांनी केली आहे. दौलताबाद वेशीजवळील अडथळे दूर करून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Web Title : दौलताबाद घाट में ट्रैफिक जाम: छुट्टियों की वजह से पर्यटकों की भीड़

Web Summary : एलोरा और खुलताबाद में छुट्टियों के दौरान पर्यटकों की भीड़ के कारण दौलताबाद घाट में भारी ट्रैफिक जाम लग गया। दौलताबाद किले के पास भीड़भाड़ के कारण हजारों लोग घंटों तक फंसे रहे। पर्यटकों ने पीक सीजन के दौरान भविष्य में होने वाली बाधाओं से बचने के लिए बेहतर योजना और वैकल्पिक मार्गों की मांग की है।

Web Title : Daultabad Ghat Traffic Jam: Holiday Rush Causes Tourist Congestion

Web Summary : Holiday crowds thronging Ellora and Khultabad caused severe traffic jams in Daultabad Ghat. Thousands were stranded for hours due to the congestion near Daultabad Fort. Tourists are demanding better planning and alternative routes to avoid future disruptions during peak seasons.