रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीनंतर घाटीत निवासी डॉक्टरांचा मास बंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 08:19 IST2018-04-26T08:19:10+5:302018-04-26T08:19:58+5:30

रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याचा आरोप करीत घाटीतील निवासी डॉक्टर रात्री मास बंक वर गेले.

Mass bunker resident doctor after assault from patient relatives | रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीनंतर घाटीत निवासी डॉक्टरांचा मास बंक

रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीनंतर घाटीत निवासी डॉक्टरांचा मास बंक

औरंगाबाद : रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याचा आरोप करीत घाटीतील निवासी डॉक्टर रात्री मास बंक वर गेले.
निवासी डॉक्टर डॉ. हर्षद चव्हाण यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. यात एका सहयोगी प्राध्यापकासही धक्काबुकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत अपघात विभागासमोर निवासी डॉक्टर एकत्र येऊन घोषणा देत होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना समजवत होते.

Web Title: Mass bunker resident doctor after assault from patient relatives