शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

मसिआ, एनएचके संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:27 AM

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा व मधुर पटेल यांच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या बळावर मसिआ संघाने युनायटेड ब्रेव्हरीज संघावर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ठळक मुद्दे राहुल, मधुर, गौरव, ऋषिकेश चमकले

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा व मधुर पटेल यांच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या बळावर मसिआ संघाने युनायटेड ब्रेव्हरीज संघावर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसºया सामन्यात गौरव शिंदे आणि ऋषिकेश तरडे यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एनएचके संघाने हायकोर्ट संघाचा १५ धावांनी पराभव केला.दुपारच्या सत्रात झालेल्या लढतीत मसिआ संघाने ब्रेव्हरीज संघाविरुद्ध २0 षटकांत ८ बाद २0७ धावांचा एव्हरेस्ट रचला. त्यांच्याकडून शैलीदार फलंदाज राहुल शर्माने अवघ्या ५४ चेंडूत २ षटकार व १0 चौकारांसह ८१ आणि मधुर पटेलने ३८ चेंडूंतच ८ टोलेजंग षटकार व ५ चौकारांसह ७७ धावांची स्फोटक खेळी केली. युनायटेड ब्रेव्हरीजकडून मनोहर सनेर याने ९ धावांत ५ बळी घेतले. पंकज फलके व श्रीकांत शिंदे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनायटेड ब्रेव्हरीज ८९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून संदीप गायकवाड (३४) व पंकज फलके (१२) हेच दोघे दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकले. मसिआकडून हितेश पटेल, मंगेश, मयूर चौधरी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.तत्पूर्वी सकाळच्या सत्रात एनएचके संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ४ बाद १७५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून उदयोन्मुख शैलीदार फलंदाज गौरव शिंदेने ५९ चेंडूंतच ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८0 आणि ऋषिकेश तरडे याने ५२ चेंडूंत ३ षटकार व ७ चौकारांसह ७३ धावांची खेळी केली. हायकोर्ट संघाकडून सचिन जैस्वाल व विजय देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात हायकोर्ट संघाने चांगली झुंज दिली; परंतु त्यांचा संघ १८.५ षटकांत १६0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून साईसागर अंबिलवादे याने ७ चौकारांसह ३८ व ज्ञानेश्वर पाटीलने २४ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. एनएचके संघाकडून ऋषिकेश तरडे व गौरव शिंदे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.