शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले!

By admin | Updated: December 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : दररोज जाळून घेण्याची धमकी काय देतेस, हे घे आज मी जाळून टाकतो तुला, असे म्हणत दारुड्याने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बालाजीनगरात घडली.

औरंगाबाद : दररोज जाळून घेण्याची धमकी काय देतेस, हे घे आज मी जाळून टाकतो तुला, असे म्हणत दारुड्याने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बालाजीनगरात घडली. या घटनेत भाजलेली महिला वंदना कंटुले (३०, रा. बालाजीनगर) हीस उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेबाबत सांगितले की, वंदनाचा पती अनिल कंटुले याला दारूचे व्यसन आहे. तो सतत दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नी वंदनासोबत वाद घालायचा. त्यातून या पती-पत्नीत सतत खटके उडायचे. १५ डिसेंबर रोजी दुपारी दारूच्या कारणावरूनच वंदनाने पतीला ‘तुम्ही रोज रोज दारू पिऊन फिरता. त्यामुळे संसारावर आर्थिक ताण पडत आहे. तुमच्या दारूला मी वैतागले. दारू सोडा नाही तर जाळून घेऊन जीवच देते’ असे सुनावले. त्यावरून अनिलने वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेले आणि मग अनिलने ‘तू सतत जाळून घेण्याची धमकी काय देतेस. थांब तू कशाला जाळून घेते, मीच जाळतो तुला, असे म्हणत त्याने आगपेटी पेटवली आणि तिच्या अंगावर फेकली. त्यामुळे वंदनाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला त्यात ती भाजली.या प्रकरणी वंदनाच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती अनिलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार भोसले हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.