शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीशी विवाह

By admin | Updated: August 21, 2014 01:22 IST

विलास भोसले ,पाटोदा नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीशी आपल्या मुलाशी हुंडा न घेता व सर्व खर्च स्वत:च उचलत येथील

विलास भोसले ,पाटोदानापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीशी आपल्या मुलाशी हुंडा न घेता व सर्व खर्च स्वत:च उचलत येथील एका वरपित्याने ‘विवाह गाठ बांधली’. त्यांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेमुळे या विवाह कार्यास ‘वऱ्हाडी’ही स्वखर्चाने आले होते. पाटोदा शहरातील बंडू रामभाऊ डिडूळ (वय २५) या शेतकऱ्याने पंधरा वर्षापूर्वी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. यावेळी त्यास सुनीता (वय ३ वर्ष) ही मुलगी होती, तसेच त्याची पत्नी गर्भवती होती. बंडुच्या आत्महत्येनंतर त्याला मुलगी झाली. ही मुलगीही मूकबधीर आहे. अशा परिस्थितीत बंडूची पत्नी यमुना व दोन मुलींना तिचे मामेसासरे हरिभाऊ भोसले यांनी धीर देत त्यांच्या पालनपोषणात मदत केली. दरम्यान, दिसामासाने वाढलेल्या सुनीताचे हात पिवळे करण्याचे वेध यमुना हिला लागले. मात्र, हलाखिची परिस्थिती असल्याने हुंडा देण्यासह थाटमाट करणे, शक्य नव्हते. अशा परिस्थितीत येथील शेतकरी बबन विश्वनाथ बामदळे यांनी समंजसपणा दाखवित, सुनीताशी आपला मुलगा सुभाष यांचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला. व तशी मागणीही स्वत:च घातली. यास वधु-वर दोघांनीही सहमती दिली. यानंतर सोमवारी बबन बामदळे यांनी हुंडा न घेता व थाटमाट न करता सुभाषचा विवाह स्वखर्चाने सुनीताशी लावून दिला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीशी असा विवाह होत असल्याने माहिती शहरातील अनेकांना झाली. यावेळी वऱ्हाडींनीही स्वत:च हजेरी लावली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख, शांतीलाल कांकरिया, विष्णूपंत घोलप, गौतम जावळे, प्रा. एल. आर. जाधव, आबासाहेब पवार, बापुराव बामदळे आदींची उपस्थिती होती.