मराठवाड्याची रेल्वे धावणार सुसाट! छ. संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा नारळ फुटणार; प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

By संतोष हिरेमठ | Updated: March 27, 2026 20:12 IST2026-03-27T20:11:35+5:302026-03-27T20:12:05+5:30

छत्रपती संभाजीनगर - परभणी रेल्वे मार्ग : पहिल्या टप्प्यातील ३८ किमीच्या दुहेरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू

Marathwada's railway will run smoothly! Chh. Sambhajinagar-Parbhani doubling will be completed; The long wait of passengers is over | मराठवाड्याची रेल्वे धावणार सुसाट! छ. संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा नारळ फुटणार; प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

मराठवाड्याची रेल्वे धावणार सुसाट! छ. संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा नारळ फुटणार; प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रवाशांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा लवकरच नारळ फुटणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर - गेवराई हाॅल्ट या ३८ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून परभणीपर्यंतचा रेल्वे प्रवास दुहेरी रेल्वे मार्गावरून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विभागाच्या मंत्रिमंडळीय समितीने जुलै २०२५ मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण सुमारे ११ हजार १६९ कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश करण्यात आला आणि अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली.

४१० कोटींची निविदा, दुहेरीकरणासह विद्युतीकरणही
छत्रपती संभाजीनगर ते गेवराई हाॅल्ट मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४१०.६९ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेमार्फत ही निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत केवळ दुहेरीकरणच नव्हे, तर संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण, सिग्नलिंग प्रणालीत सुधारणा आणि विद्यमान यंत्रणेत आवश्यक वाढीव कामेही केली जाणार आहेत. हा प्रकल्प ‘इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन’ (ईपीसी) पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून कामाची गुणवत्ता आणि वेळेवर पूर्णता यावर विशेष भर दिला जाणार आहे.

भूसंपादन प्रक्रियाही सुरू
दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी भूसंपादनासाठी अधिसूचनांही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कधीपर्यंत?
अंतर - १७७ किमी
खर्च - सुमारे २,१७९ कोटी
कालावधी : २०२९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

२१ स्टेशन, २८ मोठे पूल, १६१ छोटे पूल आणि २९ भुयारी
छत्रपती संभाजीनगर-परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणात २१ स्टेशन, २८ मोठे पूल, १६१ छोटे पूल आणि २९ भुयारी मार्गांचा समावेश असणार आहे. या दुहेरीकरणामुळे ‘डीएमआयसी’ म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील उद्योगाला मोठा फायदा होईल. प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. कुठेही अतिरिक्त थांबे घेण्याची गरज पडणार नाही. मालवाहतुकीला फायदा होईल.

Web Title : मराठवाड़ा रेलवे की गति बढ़ेगी: छत्रपति संभाजीनगर-परभणी दोहरीकरण जल्द

Web Summary : छत्रपति संभाजीनगर-परभणी रेलवे दोहरीकरण परियोजना जल्द शुरू होगी, जिससे कनेक्टिविटी में सुधार होगा। पहले चरण का टेंडर जारी हो गया है। ₹2,179 करोड़ की इस परियोजना का लक्ष्य 2029 तक यात्रा के समय को कम करना और उद्योग को बढ़ावा देना है। इसमें विद्युतीकरण और पुल निर्माण शामिल है।

Web Title : Marathwada Railway to Speed Up: Chhatrapati Sambhajinagar-Parbhani Doubling Soon

Web Summary : The Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway doubling project is set to begin, enhancing connectivity. The first phase tender is out. This ₹2,179 crore project aims to reduce travel time and boost industry by 2029. It includes electrification and bridge construction.