शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा; रब्बी पिके उद्ध्वस्त, शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:23 IST

बळीराजा हवालदिल! लातूर, बीडसह नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार; ज्वारी, गहू भुईसपाट, फळबागांचे अतोनात नुकसान

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील काही भागांत रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील काही भागांत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. रेणापुरातील काही गावांत गाराही पडल्या. या पावसामुळे रब्बी पिकांसह आंब्याचा मोहार गळून नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दुपारी ३.३०च्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. जिल्ह्यातील रेणापूर, शिरूर अनंतपाळ, येरोळ, डिगोळ, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, औसा तालुक्यातील खरोसा या भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बीतील गहू, ज्वारी, करडईला फटका बसला आहे. तसेच राशीसाठी काढणी केलेला हरभरा भिजला. आंब्याचा मोहर गळाला. द्राक्ष व इतर फळबागांचे नुकसान झाले. रेणापूरसह खरोळा, पोहरेगाव, समसापूर, कोळगाव, राजेवाडी, नेहरूनगर आदी गावांत गारपीट झाली आहे. पाऊण तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने ज्वारी भुईसपाट झाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात गारांचा मारा व अवकाळीबीड जिल्ह्यात सोमवारी दुपारच्या सुमारास अनेक तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे गारा बरसल्या तर परळी तालुक्यातील रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

धाराशिव : पिकांचे नुकसानधाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर मोठा नसला तरी सोबत असलेल्या वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यूलातूर : काही गावांमध्ये पत्र्याच्या घरांचे नुकसान झाले आहे. वायगाव (ता. उदगीर) येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिगंबर राम बेलकुंडे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडातही मोठे नुकसाननांदेड : रविवारी रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Hit by Unseasonal Rain; Crops Damaged, Farmer Dies

Web Summary : Unseasonal rains and hailstorms lashed Marathwada, damaging crops. A farmer in Udgir died due to lightning. Nanded, Parbhani, Hingoli, Beed, and Latur districts are affected, with significant losses to Rabi crops and fruit orchards.
टॅग्स :HailstormगारपीटRainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी