शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मराठवाडा तहानलेलाच; राज्यातील धरणे ६५ % जलयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:11 PM

मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत उपयुक्त साठा अत्यल्प आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात पाणीटंचाई जाणवणार 

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत अजूनही पाण्याचा खडखडाट आहे. राज्यातील धरणांमध्ये १४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची क्षमता असून, सोमवार (दि. २) अखेरीस त्यात ९३२.१४ टीएमसी (६४.५५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ६५.३४ टक्के पाणीसाठा होता. 

कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणेच जलयुक्त झाली असून, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत उपयुक्त साठा अत्यल्प आहे.जून महिन्यात मान्सून कोरडा गेल्यानंतर जुलैचा शेवटचा आणि आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली आहेत. कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील कोयना, राधानगरी, वारणावती, दूधगंगा, भाटघर, नीरा देवघर, वीर, पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना, डिंभे, चासकमान ही धरणे भरली आहेत. भीमा खोऱ्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे राज्यातील सर्वात मोठे धरण उजनीत ११७.४७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

पाणीटंचाई जाणवणार औरंगाबाद विभागात ७९.८० टीएमसी (३०.६६ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो २८ टक्के होता. नागपूर विभागामध्ये ८७.१९ टीएमसी (५३.६ टक्के) पाणीसाठा असून, गेल्यावर्षी तो ४९.८८ टक्के होता. या भागामध्ये यंदा पाणीटंचाई जाणवेल अशीच स्थिती आहे.   

50मराठवाडा, विदर्भातील बहुतांश तालुक्यांत सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस आॅगस्ट अखेरीस झाला आहे. अमरावती विभागात ५०.८२ टीएमसी (३४.३२ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात येथे ५५.६७ टक्के पाणीसाठा होता. 

90औरंगाबाद विभागाची जीवनवाहिनी जायकवाडी (पैठण) धरणात गोदावरीतील पाणी जमा झाल्याने धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला होता. 

105या धरणाची क्षमता १०५ टीएमसी असून, ७६.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात ६५.५६ टीएमसी उपयुक्तपाणीसाठा आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या वैनगंगेवरील गोसी खूर्द प्रकल्पात १६.२७ टीएमसी (६२.२७ टक्के) पाणीसाठा आहे.

20अमरावती विभागातील काटेपूर्णा, इसापूर, अरुणावती आणि पूस धरणातील पाणीसाठा २० टक्केही नाही. औरंगाबाद विभागातील मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि निम्न दुधनात उपयुक्त साठा शून्य आहे. नागपूर विभागातील बावनथडीमध्ये साडेपाच, दिना शून्य, खिडसी १७.२९ आणि तोतलाडोह ३८, कामठी खैरी २९.५९, निम्न वर्धा ४६, बोर धरणात ४२.३१ टक्के पाणीसाठा आहे. 

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा