शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणूक : सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर आहेत कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:06 IST

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत उद्योग, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

ठळक मुद्देदोन्ही प्रमुख उमेदवारांवर दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक कर्ज

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी थेट लढत अपेक्षित असणाऱ्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी काल १२ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केले. त्या अर्जांसोबत त्यांनी शपथपत्राद्वारे मालमत्तेचे विवरण दिले आहे. निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत उद्योग, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यावर अडीच कोटींच्या आसपास कर्ज असल्याचे त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्या बोराळकर यांच्याकडे स्थावर मालमत्ता पावणे सहा कोटींच्या आसपास आहे, तर पत्नी सुषमा बोराळकर यांच्या नावे साडेआठ कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. जंगम मालमत्तेचा तपशील देताना त्यांनी स्वत:च्या नावे १ कोटी ३२ लाख रुपयांची, तर पत्नीच्या नावे २० लाख रुपयांची मालमत्ता दाखविली आहे. शेती, घर, दागिने, वाहनांचा तपशील त्यांनी शपथपत्रात दिला असून कुठलाही गुन्हा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्नीच्या नावे तीसगाव येथे बाजारभावानुसार ८ कोटींची जमीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिगरशेतीची ७ कोटींच्या आसपास मालमत्ता उमेदवार बोराळकर यांच्या नावे आहे. 

चव्हाणांकडील मालमत्ताअभियांत्रीची पदवी घेतलेले राष्ट्रवादीचे उमेदवार चव्हाण आणि त्यांच्या पत्नी आशा चव्हाण यांच्या नावावर असलेल्या स्थिर, स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य सर्व मिळून १४ कोटी ४० लाखांच्या आसपास दाखविण्यात आले आहे.  पाच वर्षांतील करमूल्य उत्पादनाचा लेखाजोखा त्यांनी दिला आहे. चव्हाण दाम्पत्याकडे दीड कोटींच्या आसपास दागिने आहेत. १२ संस्थांमध्ये चव्हाण यांचे समभाग आहेत. २ कोटी ६४ लाखांच्या आसपास कर्ज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वाहन, शेती, विमा, गुंतवणूक शेअर्स, दागिने, घर आदी मालमत्तेचा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा