Maratha Reservation: सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:26 IST2021-06-22T18:25:16+5:302021-06-22T18:26:10+5:30
Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation : राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

Maratha Reservation: सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा
औरंगाबाद : राज्य आणि केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचीका दाखल केली आहे. आता दोघांनी मिळून मराठा आरक्षण टिकविण्यासाठी ताकद लावण्याची गरज आहे. हे राज्य सरकार सुप्रीम कोर्टांत मराठा आरक्षण गेले त्यानंतर अस्तिवात आले आहे. त्याच दरम्यान, दोन दिवसांचे सरकार टिकविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने जसे प्रयत्न केले होते तसेच मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करा असा टोला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला लगावला. ( Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation )
मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर यावर विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देत आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून जोर लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा, आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची मागणी #MarathaReservationpic.twitter.com/c0hKyQt2Ov
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021
तसेच मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला होता त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आले आहे. त्याच दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात सरकार थाटले. या दोन दिवसीय सरकारची आठवण पाटील यांनी राज्य सरकारला करून दिली. त्यावेळी सरकार वाचविण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकवण्यासाठी करण्यात यावेत असा टोलाही विनोद पाटील यांनी यावेळी लगावला.