शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल

By admin | Updated: June 26, 2014 00:58 IST

औरंगाबाद : वेगवेगळे निवाडे पाहता सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल, असे मत आज येथे न्या. बी. एन. देशमुख यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : वेगवेगळे निवाडे पाहता सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल, असे मत आज येथे न्या. बी. एन. देशमुख यांनी व्यक्त केले.
व्यंकटेश पाटील लिखित ‘मराठा आरक्षण : भूमिका आणि वास्तव’ या ग्रंथाच्या विमोचनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विंग कमांडर टी. आर. जाधव, कॉ. मनोहर टाकसाळ, बाबा भांड, अ‍ॅड. डी. आर. शेळके, जयाजी सूर्यवंशी, अण्णासाहेब आहेर व प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते या ग्रंथाचे विमोचन झाले. प्रारंभी लेखक व्यंकटेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. गव्हाणे यांनी या ग्रंथावर व एकूणच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मीमांसा केली.
न्या. देशमुख यांनी सांगितले की, सोळा टक्के आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. याचे आपण स्वागत करूया; पण आता ही लढाई वेगळ्या ठिकाणी सुरू होईल. महाराष्ट्र शासन आणि समाजही मराठा आरक्षण लागू करून घेण्यात यशस्वी झालेले आहे.
महाराष्ट्रीयन शेतकरी संशोधन आणि विकास परिषदेचे बाळासाहेब सराटे यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय परभणे यांनी आभार मानले.
आरक्षण देण्यात काहीही वावगे नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरीविरोधी घटना लिहिण्याचे कारण नाही. जो समाज माथाडी आहे, हमाल आहे, कष्टकरी, शेतमजूर आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहतो, त्याला आरक्षण नको, असे घटनाही सांगत नाही. मंडल आयोगाच्या लढाईत आम्ही अग्रभागी होतो.

पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी मंडल आयोगाची बाजू घेतली. त्यावेळी आम्ही हे सांगत राहिलो की, एकदा मंडल लागू होऊ द्या. मग मराठा आरक्षणाचे पाऊल पुढे पडू शकते.

साडेतीनशे वर्षांनंतर जिवासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्याही दुर्बलच असतो हे लक्षात घेतले पाहिजे. ७० टक्के मराठा समाज दरिद्री आहे. त्याला आरक्षण देण्यात काहीही वावगे नाही.

मंडल आयोग छाननी समितीत न्या. पी. बी. सावंत होते. त्यांनी या ग्रंथातील आपल्या लेखात मराठा आरक्षण टिकेल, असे मत दिले आहे. माझेही तेच मत आहे, असे न्या. देशमुख यांनी स्पष्ट केले.