शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

मराठा क्रांती मोर्चाचा ९ ऑगस्टपासून शासनाविरोधात एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 5:47 PM

क्रांतीदिनापासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर आंदोलन

ठळक मुद्दे तसेच १५ ऑगस्टपासून राज्यभर सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा निर्णय

औरंगाबाद: कोपर्डीच्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी करावी,  मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावीत आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्या ८ ऑगस्टपर्यंत न सोडविल्यास ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक औरंगाबादेतील यशवंत कला महाविद्यालयात बुधवारी दिवसभर पार पडली.बैठकीच्या सुरवातीला उपस्थित मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा गैरवापर करणार नाही, अशी सामुहिक शपथ घेतली. यानंतर दिवसभर विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोपर्डीतील पीडितेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहेत. या अपीलावर आपले म्हणणे मांडण्यासाठी शासनाने अद्यापही वकिल नेमला नाही. यामुळे आरोपींच्या या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. परिणामी आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबली आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शासनाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमली आहे. ही समिती कोणतेही काम करीत नाही. मराठा आरक्षण आंदोलनावर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्याने समाजातील ४३ तरूणांनी आत्मबलिदान दिले. यामुळे संतप्त बांधवांनी हिसंक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात दाखल झालेली गुन्हे सरसरकट मागे घ्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याबाबत निर्णय घेतला जात नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला वाढीव निधी द्यावा आणि अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते झाला.

८ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ पासून राज्यभर गणिमी कावा पद्धतीने ठिय्या आंदोलन केले जाईल. तसेच १५ ऑगस्टपासून राज्यभर सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती रविंद्र काळे पाटील यांनी दिली. यावेळी किशोर चव्हाण, सुनील कोटकर,सचिन मिसाळ, संजय सावंत, अशोक मोरे,दिलीप झगरे,विशाल पवार, मुकेश सोनवणे, रघूनाथ खेडेकर,दिगंबर गायके, योगेश शेळके, निलेश ढवळे, कल्याण शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड,अनुराधा ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद