शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

औरंगाबादेत संताप; मराठा क्रांती मोर्च्याकडून गोयलांविरोधात जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 4:22 PM

राज्यभरात या पुस्तकाचे लेखक गोयल आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने 'आजके शिवाजी:नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे लेखक व भाजपचे नेते जय भगवान गोयल यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. राज्यभरात या पुस्तकाचे लेखक गोयल आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

औरंगाबादमधील पुंडलिक नगर येथे छञपती शिवाजी महाराज चौकात लेखक गोयल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो करून त्यांच्या पुतळा जाळण्यात आला. तसेच या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी  सुद्धा यावेळी करण्यात आली. तर जय भगवान गोयल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे. तसेच या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.अन्यथा मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी यावेळी दिला.

आंदोलनात रवींद्र काळे, अशोक मोरे, किरण काळे, राहुल पाटील, अभिजीत औटे, शुभम केरे, संकेत शेटे, अजय गटाने, धनंजय देशमुख, विशाल विरळे, शुभम खानझोड, तेजस पवार, रूषी बनकर, प्रतिक पाटील, विशाल निळ, स्वराज गिरे, तेजस खरात आदींचा सहभाग होता.

लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा छञपती शिवाजी महाराजांची तुलना कोनासोबतच होऊ शकत नाही. त्यांच्या सोबत पंतप्रधानांची तुलना करणे हा खोडसाळपणा आहे. यामुळे भाजप नेत्यांनी शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराजांचा अपमान करणे व दोन समाजात दुफळी निर्माण करणे हेच भाजपाचे यामागील राजकारण आहे. याप्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन लेखकावर देशद्रोहीचा खटला दाखल कराव व  पुस्तकावर तक्ताळ बंदी घालवी, अन्यथा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्यात येईल  .- रमेश केरे पाटील, मुख्य समन्वयक 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाBJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज