आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जलकुंभावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:00 IST2018-07-28T15:57:24+5:302018-07-28T16:00:50+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुंडलिक नगर जलकुंभावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आज दुपारी ३ च्या सुमारास चढले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जलकुंभावर
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुंडलिक नगर जलकुंभावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज दुपारी ३ च्या सुमारास चढले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.
मराठा क्रांती मोर्चाचे एकूण सात आंदोलक जलकुंभावर असून खाली मोठ्या प्रमाणावर आंदोलक थांबलेले आहेत. दरम्यान, जलकुंभ जवळ पोलिसांचा फौज फाटा व अग्निशमन दल दाखल झाले आहे. मात्र, आंदोलकांनी पोलीसवर आले तर आम्ही खाली उडी घेऊ असा इशारा दिला आहे. पोलिसांची मराठा क्रांती मोर्च्याच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलणे सुरु आहे.
आंदोलनात अशोक वाघ, संतोष काळे, रमेश गायकवाड, सचिन मिसाळ आदींचा समावेश आहे. आंदोलकांनी चिट्ठी लिहित येथे जिल्हाधिकारी यांनी यावे व आम्हाला माईक देण्यात यावे अशा मागण्या केल्या आहेत.