शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

अनेक पालकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:03 IST

शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली. प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या अर्ज क्रमांकानुसार सोडत पद्धतीने (लॉटरी सिस्टिम) निघालेले क्रमांक ‘एनआयसी’कडे पाठविण्यात आले. तथापि, आजच्या या पहिल्याच फेरीला मात्र अनेक पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सभागृहात दिसून आले.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश : अर्ज क्रमांकानुसार प्रथम फेरीत राबविली सोडत पद्धत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली. प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या अर्ज क्रमांकानुसार सोडत पद्धतीने (लॉटरी सिस्टिम) निघालेले क्रमांक ‘एनआयसी’कडे पाठविण्यात आले. तथापि, आजच्या या पहिल्याच फेरीला मात्र अनेक पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सभागृहात दिसून आले.यंदा शिक्षण विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील ५६५ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ३७१ जागा निश्चित करण्यात आल्या असून, रविवारी अखेरच्या मुदतीपर्यंत ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज केले असले तरी निवास ते शाळा हे एक कि.मी.च्या आत अंतर असणाºया विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीसाठी विचार करण्यात आला. सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित केलेल्या या प्रवेश फेरीला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, रमेश ठाकूर, श्रीकांत दीक्षित व अन्य कर्मचारी उपस्थित होते.आज सोडत पद्धतीने काढण्यात आलेले क्रमांक ‘एनआयसी’ कार्यालयास पाठविण्यात आले. ‘एनआयसी’कडून उद्या रात्रीपर्यंत पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाबद्दल माहिती कळविण्यात येणार आहे. सोडत पद्धतीने मिळालेल्या शाळेत पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणे गरजचे आहे. त्यामुळे ‘एसएमएस’ आल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक असणारआहे.सर्वांसमक्ष काढले नंबर; पारदर्शक प्रक्रियासंत तुकाराम नाट्यगृहात उपस्थित पालकांना राबविण्यात येणाºया लॉटरी सिस्टिमबद्दल अगोदर माहिती देण्यात आली. सर्वांसमक्ष काचेची चार भांडे ठेवण्यात आली. त्या चारही काचेच्या भांड्यांत ० ते ९ क्रमांकाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.पालकांसोबत आलेल्या बालकांच्या हाताने चारही भांड्यांतून प्रत्येकी एक अशा चार चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आॅनलाईन नोंदणी केलेल्या पालकांच्या अर्जांचा क्रमांक चारअंकी असल्यामुळे चार चिठ्ठ्या काढून चारअंकी क्रमांक जोडण्यात आला. अशा पद्धतीने क्रमांक काढून शिक्षण विभागाने पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवली. सदरील काढलेले क्रमांक तात्काळ ‘एनआयसी’ कार्यालयास कळविण्यात आले.