शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाविषयी अनेक तक्रारी

By admin | Updated: July 6, 2014 00:12 IST

परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई देताना भेदभाव झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई देताना भेदभाव झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्हाभरात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या नुकसानीचे पंचनामे करुन काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. परंतु, पंचनामे करताना अनेक गावे, शेतकरी वगळण्यात आले. कर्मचाऱ्यांनी भेदभाव केला, अशा तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.गावांचा समावेश कराशेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले असून गारपिटीमुळे शेतकरी हाताश झाला आहे. त्याच्यावर संकट ओढवले असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी बहुतांश गावे अनुदानाच्या यादीतून वगळण्यात आली. परभणी तालुक्यातील देवठाणा, संबर, दुरडी, पिंपळगाव टोंग, धारणगाव, धार, मुरुंबा, सावंगी खु., मटकऱ्हाळा या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करुन अनुदान वाटप करावे, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे रंगनाथ चोपडे, विशाल पाते, गणेश पवार, भास्कर खटींग, रामेश्वर डुकरे, पंडितराव पवार, मधुकर चोपडे, बन्सीराम डुकरे, भाऊसाहेब चव्हाण, निवृत्ती चव्हाण, संतोष पाते, रामा खटिंग, किशोर ढगे, देवीदास झाडे आदींनी दिला आहे.खोटे पंचनामे केलेमानवत तालुक्यातील लोहरा येथे गारपीट नुकसानीचे पंचनामे बोगस करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कमी जमीन असताना जास्त जमिनीचे पंचनामे दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली. काही शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले. तलाठी व कृषी सहाय्यकाने चावडी वाचन न करताच यादी तयार केली. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करावी व नुकसानीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी लोहरा येथील ३५ ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)बोगस पंचनामेपालम तालुक्यातील सायाळा येथील गारपिटीचा सर्वे करण्यात आला. परंतु, पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावे २ हेक्टरच्या आत जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनासुद्धा ५ ते २० हजार रुपये मदत मिळाली. परंतु, ज्यांच्या नावे १२ ते १८ एकर जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत मदत दिली आहे. त्यामुळे फेरसर्वे करुन योग्य त्या शेतकऱ्यांना मदत द्यावी व जाणीवपूर्वक मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी लक्ष्मण चवरे, श्यामराव आव्हाड, नरहरी कोल्हे, विष्णूदास चवरे, गजानन चवरे, रामकिशन नवघरे, राजेभाऊ नवघरे, शंभूदेव खटीेंग आदींनी केले आहे.शेतकरी अनुदानापासून वंचितमानवत तालुक्यातील वझर खु.येथील अनेक शेतकरी गारपीट अनुदानापासून वंचित आहेत. या गावात गारपिटीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने ठरावीक शेतकऱ्यांना भेटून पंचनामा केला. काही लोकांची जाणूनबुजून नावे टाकली नाहीत. तर काहींना व्यवस्थित भरपाई दिली नाही. पंचनाम्याचे चावडीवाचनही झाले नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करावी व संबंधितावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वझूर खु. येथील आशाबाई गिराम, मारोती शिंदे, परमेश्वर कटके, रतन शिंदे, लक्ष्मण शिंदे, नारायण राठोड, विलास वाहुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.