शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोधैर्या’चे अनुदान रखडले !

By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST

हणमंत गायकवाड , लातूर बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालकांच्या ‘मनोधैर्या योजने’तील ३५ पैकी १३ प्रकरणाचा निधी रखडला आहे.

हणमंत गायकवाड , लातूरबलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालकांच्या ‘मनोधैर्या योजने’तील ३५ पैकी १३ प्रकरणाचा निधी रखडला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. शासनाकडून अनुदान आले नसल्याने लाभार्थी वंचित आहेत.२ आॅक्टोबर २०१३ पासून महाराष्ट्र राज्यात मनोधैर्य योजना अंमलात आली आहे. जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत जिल्ह्यात ११ बलात्काराच्या आणि २४ बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यातील पीडितांनी महिला व बालकल्याण विभागाकडे मनोधैर्य योजनेतून वित्तीय सहाय्य, समुपदेशन, निवारा व वैद्यकीय तसेच कायदेशीर मदत मिळावी म्हणून प्रस्ताव दाखल केले आहेत. या प्रस्तावानुसार ३५ पैकी १२ प्रकरणांत पीडितांना लाभ देण्यात आला आहे. प्रत्येकी २ लाख रुपयाप्रमाणे ३४ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरीत केला आहे. उर्वरित १३ प्रकरणांत पीडितांना मदत मिळाली नाही. १३ पैकी ४ बलात्काराची, ९ बाललैंगिक अत्याचाराची प्रकरणे आहेत. शासनाकडून ३७ लाखांचा निधी या प्रकरणासाठी मंजूर झाला आहे. परंतु, अद्याप पीडितांना तो मिळू शकला नाही. स्थानिक अधिकारी प्रस्ताव पाठविल्यानंतर पाठपुरावा करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या पदरात वेळेत हा निधी पडत नाही. शिवाय, मदतीपुरतेच प्रस्ताव घेतले जात आहेत. समुपदेशन, निवारा, मानसोपचार तज्ज्ञांची सेवा देण्याकडे स्थानिक प्रशासनाचा कल दिसत नाही. पीडितांकडून तसे प्रस्ताव आले नसल्याचे सांगितले जाते. एक वर्षाच्या कालावधीत बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराच्या फक्त ३५ प्रस्ताव महिला बालविकास विभागाकडे दाखल झाले आहेत. वास्तविक पाहता विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांचा आकडा मोठा आहे. परंतु, पीडितांनी स्वत: प्रस्ताव देणे ही अट असल्याने लाभार्थी नगण्य आहेत.बलात्कार प्रकरणात मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी २५ टक्के निधी पीडितांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतो. तर ७५ टक्के निधी एफडी केला जातो. बाललैंगिक अत्याचार प्रकरणात ७५ टक्के निधी पीडित मुलांच्या १८ वर्षांपर्यंत बँक खात्यावर ठेवला जातो. तर २५ टक्के निधी तीन वर्षांच्या मुदतीवर ठेवला जातो. अशा पद्धतीने २२ प्रकरणांत ३४ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरीत केला असल्याचे महिला व बालविकास अधिकारी बी.एच. निपाणीकर यांनी सांगितले.