शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

जनता मार्केटच्या तळमजल्यातील व्यापाऱ्यांचे मनपाला साकडे

By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST

नांदेड : जनता मार्केटच्या इमारतीचा पहिला मजला धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला

नांदेड : जनता मार्केटच्या इमारतीचा पहिला मजला धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला असला तरी तळमजला मात्र डागडुजी करून पाच वर्षे टिकू शकतो असेही अभियांत्रिकी अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे़ त्यामुळे तळमजल्यातील व्यापाऱ्यांना १५ दिवसांत गाळे रिकामे करा म्हणणे अन्यायकारक ठरेल, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे़ जनता मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील गाळेधारकांना सात दिवसांत गाळे रिकामे करण्याच्या सूचना मनपाने नोटीशीद्वारे दिल्या आहेत़ तसेच तळमजल्यातील गाळेधारकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे़ दरम्यान, या संदर्भात भाडेकरू व्यापारी असोसिएशनने मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली आहे़ त्यांनीही व्यापाऱ्यांचे मुद्दे सहानुभूतीपूर्वक समजून घेतले आहे़ त्यामुळे व्यापाऱ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालातील तळमजल्याविषयीच्या टिपणीचा हवाला देत गाळे रिकामे करण्याच्या नोटीशीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे़ तसेच पहिल्या मजल्यावरील गाळे धारक स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या योग्य जागेबाबत तसेच भविष्यात नव्या इमारतीत मिळणाऱ्या जागेबाबत मनपाशी चर्चा करीत आहे़ या सर्व विषयाचा लेखी लेखाजोखा दोन्ही पातळीवर होवून सुस्पष्ट करार व्हावेत, अशी भूमिकाही मांडली जात आहे़ परंतु तळमजल्यावर लाखो रुपयांचे मोठे व्यावसायिक व व्यापारी आहेत़ त्यांचा उदरनिर्वाह, व्यवसाय हा मुख्य रस्त्यावरील गाळ्यांवरच आधारित आहे़ त्यामुळे तळमजल्यातील व्यापारी पाच वर्षे तळमजला टिकू शकतो, तर मग सर्वांनाच गाळे खाली करण्याची सक्ती कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत आहे़ चर्चा करून तळमजल्यावरील व्यापाऱ्यांना अधिकचा वेळ दिला तर त्यांचे मोठे नुकसान टळणार आहे़ शिवाय पहिल्या मजल्यावरील एक व्यावसायिकानेही आपण खाजगी परंतु अधिकृत बांधकाम तज्ज्ञाशी सल्लामसलत करू अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांनी सांगितले, सिमेंट काँक्रीटच्या इमारतीचे आयुष्य साधारणपणे ५० ते ६० वर्षे असते़ परंतु ३०-३५ वर्षात ही इमारत धोकादायक झाली, याबद्दल शासकीय यंत्रणेचा अहवाल तूर्त मान्य करणे हाच आमच्यासमोर पर्याय आहे़ परंतु वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे व त्या अनुषंगाने महापालिकेनेही न्यायाच्या भूमिकेने याकडे पहावे, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)