शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापक, संचालकांवर गुन्हा

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

तुळजापूर : ठेव योजनेत ठेवलेल्या २१ लाख २४ हजार रूपयांसाठी वारंवार चकरा मारूनही पैसे न देता शाखेतून हकलून दिल्याप्रकरणी ‘बीएचआर’च्या तुळजापूर येथील

तुळजापूर : ठेव योजनेत ठेवलेल्या २१ लाख २४ हजार रूपयांसाठी वारंवार चकरा मारूनही पैसे न देता शाखेतून हकलून दिल्याप्रकरणी ‘बीएचआर’च्या तुळजापूर येथील शाखाधिकाऱ्यासह कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, संचालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, बँकेच्या शाखाधिकाऱ्यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लातूर येथील व्यापारी आनंद विमलचंद आग्रवाल (वय-३७) यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या तुळजापूर शाखेचे शाखाधिकारी दौलत सुधीर कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून शाखेत ‘संजीवन’ ठेव योजनेंतर्गत २१ लाख २४ हजार रूपये ठेवले होते़ या ठेवीची मुदत संपल्यानंतर व्यापारी आनंद आग्रवाल यांनी तुळजापूर येथील शाखेत पैशाची मागणी केली़ वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आनंद आग्रवाल यांनी सोमवारी ‘बीएचआर’च्या तुळजापूर शाखेत ‘पैसे दिल्याशिवाय जाणार नाही’ असा आक्रमक पवित्रा घेत ठाण मांडली़ त्यावेळी शाखाधिकारी कुलकर्णी यांनी ‘पैसे मिळणार नाहीत’ असे म्हणून हाकलून दिल्याची फिर्याद आनंद आग्रवाल यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून शाखाव्यस्थापक, शाखेतील कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंढे हे करीत आहेत़ (वार्ताहर)