शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम’बाबत सकारात्मक निर्णय घेणार

By admin | Updated: December 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात अभ्यासाअंती सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

औरंगाबाद : मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात अभ्यासाअंती सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.‘आयआयएम’मराठवाडा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. समितीचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सर्वप्रथम सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची ओळख करून दिली. सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी ‘आयआयएम’ही शिखर संस्था औरंगाबादेत का सुरू व्हावी आणि त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा कशा पद्धतीने उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती दिली. राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी मराठवाड्याला ही शिखर संस्था मिळाल्यास मागील अनेक वर्षांचा शैक्षणिक अनुशेष दूर होईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मराठवाड्यातील प्रश्न माहीत आहेत. अभ्यासाअंती आयआयएमचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.उद्धव ठाकरे यांचेही आश्वासन‘आयआयएम’कृती समितीने सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यांनी दहा मिनिटे समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळीही मुकुंद कुलकर्णी यांनी ‘आयआयएम’संदर्भात बाजू मांडली. औरंगाबादेतच आयआयएम ही संस्था सुरू व्हावी या दृष्टीने आपण मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हा विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल आणि आयआयएम मराठवाड्याच्या पदरात कसे पडेल या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती होती.खैरे यांची लोकसभेत मागणीडीएमआयसीसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प औरंगाबादेत येत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादने औद्योगिक शहर म्हणून जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. येथील उद्योगाला आयआयएमची जोड मिळाल्यास मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल. त्यामुळे केंद्र शासनाने आयआयएमची शाखा औरंगाबादेतच सुरू करावी, अशी आग्रही मागणी खा.चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात आज केली.