कन्नड/शिवना : एकेकाळी महाराष्ट्राचे नाव होते; पण आता विकासदरात महाराष्ट्र मागे पडला आहे. पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. सर्वांत जास्त गुन्हेगारी, बेकारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार नाही. महाराष्ट्र कर्जात बुडाला. औद्योगिक गुंतवणूक ४० टक्क्यांनी घटली. बेरोजगारांची समस्या आहे, असे आरोप करून गरिबांना हात देऊन त्यांना विकासाकडे नेण्यासाठी परिवर्तन घडवा, असे आवाहन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी देवगाव (रं.) येथे केले. त्या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार संजय गव्हाणे आणि सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे भाजपा उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होत्या.शिवना येथे काँग्रेसचे गजानन पोटदुखे, मनसेचे सतीश चव्हाण, नारायण गायकवाड, अजगर कुरेशी यांनी भाजपात प्रवेश केला.राज्यात धरण आहे, तर कॅनाल नाही, कॅनाल आहे, तर चाऱ्या नाहीत, अशी अवस्था असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र माझे माहेर असून, मी माहेरी आले आहे. त्यामुळे मी माझ्या लहान भावासाठी मागायला आले आहे आणि ते तुम्ही द्याल असा विश्वास आहे, अशी भावनिक सादही त्यांनी घातली.
विकासाकडे नेण्यासाठी परिवर्तन घडवा
By admin | Updated: October 7, 2014 00:42 IST
कन्नड/शिवना : एकेकाळी महाराष्ट्राचे नाव होते; पण आता विकासदरात महाराष्ट्र मागे पडला आहे.
विकासाकडे नेण्यासाठी परिवर्तन घडवा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}