शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मेजर सासणे तुम आगे बढोऽऽ

By admin | Updated: December 2, 2014 00:48 IST

उस्मानाबाद : ‘भारत माता की जय... मेजर सासणे तुम आगे बढोऽऽ’ या गगणभेदी घोषणांच्या गजरात मेजर सुभाष सासणे यांनी उस्मानाबादच्या मातीत एक-दोन नव्हे तब्बल चार

उस्मानाबाद : ‘भारत माता की जय... मेजर सासणे तुम आगे बढोऽऽ’ या गगणभेदी घोषणांच्या गजरात मेजर सुभाष सासणे यांनी उस्मानाबादच्या मातीत एक-दोन नव्हे तब्बल चार विश्वविक्रमांची नोंद केली. विश्वविक्रमाचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी आलेल्या प्रत्येकांच्या नजरा केवळ आणि केवळ सासणे यांच्या कामगिरीकडे लागल्या होत्या़ एका मिनिटांच्या क्रीडा प्रकारात सासणे यांनी केलेली कामगिरी हीच दिवसभर उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली होती़जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी विश्वविक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष सोमवारकडे लागले होते़ वयाची ४८ वर्षे ओलांडलेले सासणे हे विश्वविक्रम रचणार यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच खेळाडूंची पावले श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलाकडे वळत होती़ साधारणत: सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरीक्षक पंचांसह तीन प्रशासकीय कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणात मेजर सुभाष सासणे यांनी विश्वविक्रमी कामगिरी सुरू केली़सासणे यांचे जिल्हा क्रीडा संकुलावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट आणि गगणभेदी घोषणांनी स्वागत करण्यात आले़ सासणे यांनी यापूर्वी लातूर येथे २४ तास स्टेप अप्सचा विक्रम केला आहे़ त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे प्रत्येकांच्या नजरा लागल्या होत्या़ प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या़ त्यानंतर सासणे यांनी प्रथमत: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एका मिनिटात ५२ स्टेपअप्स मारण्याचा विक्रम मोडीत काढला़ सासणे यांनी पाठीवर ४० पौंड वजन घेवून ५८ स्टेपअप्स मारले़ पहिल्याच प्रयत्नात सासणे यांनी विश्वविक्रम रचल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता़ काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर सासणे यांनी पाठीवर ८० पैंड वजन घेवून ४२ पुशअप्स मारत ब्रिटनच्या पैडी डोएल याच्या नावे असलेला विश्वविक्रम मोडला़ त्यानंतर पुश अप्स आॅन मेडिसीन बॉल क्रीडा प्रकारात सासणे यांनी जर्मनीच्या ग्रेगर श्रेगलचा एका मिनिटात ४७ पुश अप्स मारण्याचा विक्रम मोडत ५५ पुशअप्स मारत विश्वविक्रमांची हॅटट्रीक रचली़ त्यानंतर चौथा क्रीडा प्रकार हा त्यांनी स्वत: विकसित केलेला होता़ पुश अप्स वुईथ क्लॅप्स् या क्रीडा प्रकारात त्यांना एका मिनिटात २५ पुशअप्स काढण्याचे टार्गेट देण्यात आले होते़ उस्मानाबादच्या मातीत जगातील पहिला आणि सासणे यांचा चौथा विश्वविक्रम रचण्यासाठी ते मॅटवर उभा राहताच उपस्थितांनी एकच घोषणा देत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना शुभेच्छा दिल्या़ पूर्णत: शरीर थकलेले असतानाही सासणे यांनी ४५ पुशअप्स काढून नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली़ हा विक्रम होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला़ या विश्व विक्रमाचे मुख्य पंच म्हणून कोल्हापूर येथील जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय पंच अजित पाटील यांनी काम पाहिले़ तर बेंबळी येथील सरस्वती हायस्कूलचे अ‍ॅथलेटीक्स कोच मोहन पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील गणेश पवार, सत्यन जाधव, रूईभर येथील राजाभाऊ शिंदे, प्रशांत घाडगे यांनी टाईम किपर, मेजरमेंट इक्युमेंट सेटअप म्हणून काम पाहिले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, रवींद्र केसकर यांनी केले़ चार विश्व विक्रमानंतर सासणे यांचा उपस्थितांनी सत्कार केला़ (प्रतिनिधी)४सासणे यांनी रचलेल्या चारही विश्वविक्रमाचे तीन प्रशासकीय कॅमेऱ्यांमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे़ या कॅमेऱ्यातील फुटेजची सीडी बनवून ती लंडन येथील गिनीज बुक रेकॉर्ड कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे़ तेथे व्हिडिओची पाहणी करून अधिकृतरित्या विश्वविक्रमावर शिक्का मोर्तब्ब करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ चारही विश्वविक्रम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असून, गिनीज बुक रेकॉर्ड कार्यालयाकडील अधिकृत शिक्कामोर्तबकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़