छ. संभाजीनगरमध्ये आता 'महिंद्रा'चा धमाका! शेंद्रा एमआयडीसीमध्ये १५० एकरवर होणार प्रकल्प?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:42 IST2026-03-14T12:41:49+5:302026-03-14T12:42:06+5:30

जयपूर एमआयडीसीमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा भव्य प्रकल्प; १५० एकर जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mahindra & Mahindra to Set Up New Project on 150 Acres in extended Shendra MIDC, Chhatrapati Sambhajinagar | छ. संभाजीनगरमध्ये आता 'महिंद्रा'चा धमाका! शेंद्रा एमआयडीसीमध्ये १५० एकरवर होणार प्रकल्प?

छ. संभाजीनगरमध्ये आता 'महिंद्रा'चा धमाका! शेंद्रा एमआयडीसीमध्ये १५० एकरवर होणार प्रकल्प?

छत्रपती संभाजीनगर: अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसीमध्ये आता ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपला भव्य प्रकल्प साकारणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच याठिकाणी १५० एकर जागेची पाहणी केली असून, ही जमीन कंपनीला पसंत पडल्याची माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली आहे.

ऑरिकनंतर जयपूरला पसंती
बिडकीन आणि शेंद्रा ऑरिकमध्ये टोयोटा, जेएसडब्ल्यू यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनानंतर औद्योगिक भूखंडांची मागणी वाढली आहे. मात्र, ऑरिकमध्ये सध्या मोठा भूखंड शिल्लक नसल्याने, उद्योग विभागाने महिंद्रा कंपनीसमोर जयपूर एमआयडीसीचा पर्याय ठेवला होता. महिंद्रा कंपनीला एकूण ३०० एकर जागेची आवश्यकता असून, त्यापैकी १५० एकर ऑरिकमध्ये आणि उर्वरित १५० एकर जयपूरमध्ये देण्याचे नियोजन आहे.

लवकरच होणार सामंजस्य करार
महिंद्रा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची पाहणी केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जरी अद्याप ५ टक्के रक्कम एमआयडीसीकडे भरली नसली, तरी येत्या काही महिन्यांत राज्य शासनाच्या उद्योग विभागासोबत या प्रकल्पासाठी अधिकृत सामंजस्य करार (MoU) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Web Title : महिंद्रा का बड़ा कदम: छत्रपति संभाजीनगर के शेंद्रा एमआईडीसी में परियोजना की संभावना

Web Summary : महिंद्रा एंड महिंद्रा की छत्रपति संभाजीनगर के शेंद्रा एमआईडीसी में 150 एकड़ जमीन पर बड़ी परियोजना की योजना है। सकारात्मक निरीक्षण के बाद, राज्य सरकार के साथ एक समझौता ज्ञापन जल्द ही होने की उम्मीद है। निवेश से स्थानीय युवाओं के लिए रोजगार सृजन होगा।

Web Title : Mahindra's Big Move: Project Likely in Chhatrapati Sambhajinagar's Shendra MIDC

Web Summary : Mahindra & Mahindra eyes 150 acres in Shendra MIDC, Chhatrapati Sambhajinagar, for a major project. After positive site visits, an MoU with the state government is expected soon. The investment promises significant job creation for local youth.