महाशिवरात्रीला घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलणार; वेरूळमध्ये ३६ तास 'नो व्हेईकल झोन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:06 IST2026-02-14T13:05:59+5:302026-02-14T13:06:38+5:30

महाशिवरात्रीला घृष्णेश्वर दर्शनाला जाताय? वेरूळमध्ये ३६ तास वाहनांना बंदी, पार्किंगसाठी नवीन जागा जाहीर!

Mahashivratri 2026: Ellora Declared 'No Vehicle Zone' for 36 Hours; Traffic Routes Diverted for Grishneshwar Temple, know the alternate roads | महाशिवरात्रीला घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलणार; वेरूळमध्ये ३६ तास 'नो व्हेईकल झोन'

महाशिवरात्रीला घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलणार; वेरूळमध्ये ३६ तास 'नो व्हेईकल झोन'

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. यादरम्यान शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ असे ३६ तास वेरुळ गावातील भगवान महावीर चौक ते मालोजी राजे भोसले चौक हा संपूर्ण परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घाेषित केला आहे. या निर्णयामुळे मंदिरापर्यंत गावातून जाणारा रस्ता मोकळा राहील.

यंदा घृष्णेश्वर मंदिरात राज्यभरातून ५ ते ६ लाख भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. यादरम्यान परिसरात भाविकांसह वाहनांची मोठी वर्दळ राहते. वेरूळ गावात पार्किंगची पुरेशी सोय व जागा नसल्याने भाविक वेरूळ गावात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. परिणामी, दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गावातील महावीर चौक ते मालोजी राजे भोसले चौक या दरम्यानच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल, असे स्पष्ट केले. त्यासाठी दोन्ही चौकांच्या पलीकडे वाहनांच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे.

आजपासून १९ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीत बदल
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ गावात वाहतूककोंडी टाळण्यासाठी दि. १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्याचे पत्रक पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले.

असा असेल बदल
- कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहने कन्नड, वेरूळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
-छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.
-फुलंब्री, सुलतानपूर, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळ मार्गे कन्नडकडे जातील.

Web Title : महाशिवरात्रि पर घृष्णेश्वर मंदिर में उमड़ेगी भीड़; वेरुल में वाहन निषेध

Web Summary : महाशिवरात्रि पर घृष्णेश्वर मंदिर में लाखों भक्तों की उम्मीद है। वेरुल 36 घंटे के लिए 'नो व्हीकल ज़ोन' रहेगा। भीड़ को प्रबंधित करने और भीड़भाड़ को रोकने के लिए 14-19 फरवरी से यातायात परिवर्तन लागू किए गए हैं।

Web Title : Grishneshwar Temple Gears Up; No Vehicles in Verul for Mahashivratri

Web Summary : Grishneshwar temple expects lakhs of devotees for Mahashivratri. Verul will be a 'No Vehicle Zone' for 36 hours. Traffic diversions are in place from February 14-19 to manage the expected crowds and prevent congestion.