Vidhan Sabha 2019: भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे बंधन नाही - बागडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:02 IST2019-10-01T05:02:03+5:302019-10-01T05:02:28+5:30
भारतीय जनता पक्ष ज्या घटनेच्या आधारावर चालतो. त्यामध्ये कोठेही ७५ वय झालेल्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी नोंद करण्यात आलेली नाही.

Vidhan Sabha 2019: भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे बंधन नाही - बागडे
औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष ज्या घटनेच्या आधारावर चालतो. त्यामध्ये कोठेही ७५ वय झालेल्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी नोंद करण्यात आलेली नाही. जो मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची सेवा करू शकतो. त्यांना उमेदवारी देण्यात येते. त्यामुळे ३ सप्टेंबरला फुलंब्रीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले.
भाजपने लोकसभा निवडणुकीत ७५ पेक्षा अधिक वय झालेल्या व्यक्तींना उमेदवारी नाकारली होती. याची पुनरावृत्ती राज्यात केली जाणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.