शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:45 PM

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुरु 

ठळक मुद्देपाठिंबा दिलेला उमेदवार सक्षम हवा

औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदारसंघात रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद ठरल्यानंतर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, असा पेच काँग्रेससमोर उभा राहिला आहे. यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेण्यासाठी उद्या, दि.९ आॅक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक डॉ. जितेंद्र देहाडे यांनी सांगितले. 

सकाळी ११ वा. एएस क्लबसमोरील कैलास हॉटेलमध्ये ही बैठक होईल. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेच या बैठकीस अपेक्षित आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेवराव पवार व माजी खासदार उत्तमसिंह पवार यांची विशेष उपस्थिती राहील. यावेळी पदाधिकाऱ्यांची मनोगते ऐकून घेण्यात येतील. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कानावर बैठकीचा सूर घालण्यात येईल व नंतर जो काही व्हायचा तो निर्णय होईल. 

रिपाइं डीचे रमेश गायकवाड यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची ही जागा सुटली होती. वस्तुत: काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु त्यांना डावलून गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली. अर्जातील किरकोळ त्रुटी त्यांनी सांगूनही दूर न केल्यामुळे गायकवाड यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले. 

या मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट हे तर उभे आहेतच; पण त्यांना भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचा मुकाबला करावा लागणार आहे. काँग्रेसचा पाठिंबा अपक्ष उमेदवार विठ्ठल माळी व पंकजा माने यांनी मागितला आहे. विठ्ठल माळी हे तर नवखेच आहेत. पंकजा माने यांनी काँग्रेसमध्ये काम केलेले आहे व तिकीटही मागितले होते. ते न मिळाल्याने अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला.

पाठिंबा दिलेला उमेदवार सक्षम हवाउद्या होणाऱ्या बैठकीत कुणाकडे पदाधिकाऱ्यांचा कल राहतो ते बघावयाचे. राजू शिंदे यांच्या नावाचा पाठिंब्यासाठी विचार होईल, असे दिसत नाही. माळी आणि माने या नावावर चर्चा होऊ शकेल. मात्र, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींना विचारून घेतला जाईल. पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला किमान पंधरा हजारांवर मते मिळाली पाहिजेत. काँग्रेसची पत तरी याठिकाणी राहिली पाहिजे, असे मानणाराही एक मतप्रवाह आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम