शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

भाजपकडून पंचाहत्तरीतील हरिभाऊ बागडे यांनाच पुनश्च संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:42 PM

७५ वर्षावरून लोकसभेत 'अध्यक्षांना' तर विधानसभेत 'नियमाला' डावलले

औरंगाबाद : भाजपने लोकसभा निवडणुकीत ७५ पेक्षा अधिक वय झालेल्या व्यक्तींना उमेदवारी नाकारली होती. यात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचाही समावेश होता. मात्र महाराष्ट्रात फुलंब्री विधानसभेसाठी पक्षाने पंचाहत्तरीत प्रवेश केलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपने ७५ पेक्षा अधिक वय झालेल्या व्यक्तींना उमेदवारी नाकारण्यात आली होती. याची पुनरावृत्ती राज्य विधानसभा निवडणुकीत केली जाणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ७५ मध्ये असलेले विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी कापण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र कॉंग्रेसच्या कल्याण काळे या तगड्या उमेदवाराविरोधात भाजपने हरिभाऊ बागडे यांनाच पुन्हा संधी दिली आहे. 

सोमवारी बागडे यांनी भारतीय जनता पक्ष ज्या घटनेच्या आधारावर चालतो. त्यामध्ये कोठेही ७५ वय झालेल्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी नोंद करण्यात आलेली नाही. जो मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची सेवा करू शकतो. त्यांना उमेदवारी देण्यात येते असा विश्वास व्यक्त केला होता. यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा दावा खोटा ठरला असून भाजपने लोकसभेत 'अध्यक्षांना' तर विधानसभेत 'नियमाला' डावलले असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.

हा दावाच चुकीचा ७५ वर्षे वय झाल्यानंतर उमेदवारी नाही, हा दावाच चुकीचा असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. उलट वयापेक्षा जो व्यक्ती मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. जनतेची कामे करू शकतो, अशा व्यक्तींना उमेदवारी पक्ष नाकारू शकत नाही, असे सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद