शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

‘मग्रारोहयो’चा उडाला बोजवारा

By admin | Updated: July 2, 2014 00:31 IST

गोकुळ भवरे , किनवट मागणीप्रमाणे काम व कामाचे दाम वेळेवर मिळत नसल्याने मग्रारोहयो योजनेचा किनवट तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे़

गोकुळ भवरे , किनवटमागणीप्रमाणे काम व कामाचे दाम वेळेवर मिळत नसल्याने मग्रारोहयो योजनेचा किनवट तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे़ही योजना २ फेबु्रवारी २००६ रोजी राज्यात सुरू करण्यात आली़ सुरुवातीला या योजनेकडे मजुरांचा कल नव्हता़ तसेच ग्रामसेवकांनीही याकडे पाठ फिरविली होती़ परिणामी ही योजना अशी तशीच राबवल्या गेली़ मात्र २००९-१० नंतर कशीबशी ही योजना राबवण्यासाठी सुरुवात झाली़ मात्र, नोंदणी केलेल्या व जॉबकार्ड वितरीत केलेल्या मजुरांना म्हणावे तसे काम ग्रामपंचायतीने व यंत्रणेने उपलब्ध करून दिले नाही़ २०११-१२ या वर्षातील तर मजुरांचे देयके व हजेरीपट अडकूनच आहेत़ १ कोटी ९७ लाख रुपये ७७७ देयके व हजेरीपटापोटी अडकूनच असल्याने मग्रारोहयोच्या कामांना गतीच नाही़ तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नोंदणीकृत ८३ हजार ९९७ मजूर असून जॉबकार्डधारक कुटुंबे ३८ हजाराच्यावर असताना मागेल त्याला काम या कामाप्रमाणे दाम देण्यासाठी सुरू असलेल्या या योजनेच्या कामावर फार कमी मजुरांची उपस्थिती गेल्या चार वर्षात दिसून येते़ १३४ ग्रामपंचायती असताना सरासरी १०० ग्रामपंचायतीनेच मग्रारोहयोची कामे केली आहे़ कामाची मागणी केल्यानंतर मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना मागणी करूनही काम मिळालेले नाही़ काम केले तर वेळेवर दामही मिळाले नसल्याने या कामांकडे मजुरांची पाठच असल्याने नोंदणी केलेल्या मजुरांचा आकडा भलामोठा असला तरी प्रत्यक्षात कामावरील मजुरांचा गेल्या चार वर्षातील आकडा वाढलाच नसल्याने ही योजना उदासीनतेने राबविल्या गेल्याचे दिसून येते़ तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असताना केवळ दोनच वर्षात १०० ग्रामपंचायतीने मग्रारोहयोची कामे केली़ १०० टक्के ग्रामपंचायतीत ही योजना राबवल्या गेलीच नाही़ मोठ्या अपेक्षेने मजुरांसाठी सुरू केलेल्या या योजनेला तालुक्यात वावच मिळाला नसल्याचे वर्षनिहाय प्राप्त मजूर उपस्थिती व ग्रामपंचायतीने केलेल्या कामावरून दिसून येते़