प्रेमाचा दुखद शेवट; लॉजमध्ये प्रियकर-प्रेयसीची आत्महत्या, ३ दिवसांनंतर आढळले मृतदेह

By राम शिनगारे | Updated: August 3, 2022 19:57 IST2022-08-03T19:57:39+5:302022-08-03T19:57:53+5:30

प्रियकर-प्रेयसी एकत्र लॉजमध्ये; ३ दिवसानंतर रूममधून दुर्गंधी आल्याने खळबळ उडाली, आढळले मृतदेह

Love ends badly; boyfriend-girlfriend commits suicide in lodge, bodies found after 3 days | प्रेमाचा दुखद शेवट; लॉजमध्ये प्रियकर-प्रेयसीची आत्महत्या, ३ दिवसांनंतर आढळले मृतदेह

प्रेमाचा दुखद शेवट; लॉजमध्ये प्रियकर-प्रेयसीची आत्महत्या, ३ दिवसांनंतर आढळले मृतदेह

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रेमसंबंधाचा शेवट वाईट पद्धतीने झाला. रेल्वेस्टेशन परिसरातील द ग्रेट पंजाब हॉटेलमधील २०५ नंबरच्या रुममध्ये प्रियकराने गळफास घेतला तर प्रेयसीने प्रियेसीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सागर राजेश बावणे (२२, रा. संभाजी कॉलनी, एन ६, सिडको) आणि सपना अंकुश खंदारे (२१, प्लॉट नंबर ३४, लक्ष्मीनगर मुकुंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या प्रेमयुगुलांची नावे आहेत. दोघे आंतरजातीय असल्याचे समोर आले आहे. मृत युवक सागर बावणे याने २९ जुलै रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील ग्रेट पंजाब हॉटेलमधील रुम नंबर २०५ बुक केली होती. त्या रुममध्ये सपना खंदारे ही ३० जुलै रोजी दाखल झाली. दोघांचे आधारकार्ड हॉटेलचालकांनी घेतले होते. रुममध्ये गेल्यानंतर दोघांनी कोणतीही ऑर्डर व्यवस्थापनाकडे केली नाही. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वच्छता कर्मचारी रुमच्या बाहेर झाडू मारीत असताना रुममधुन आतमधुन दुर्गंधी येऊ लागली. 

कर्मचाऱ्याने रुमचा दरवाजा वाजवला असता, आतुन प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांने हॉटेल व्यवस्थापकाला याविषयी माहिती दिली. हॉटेल व्यवस्थापकांनी तात्काळ वेदांतनगर पोलिसांना कळविले. त्यानुसार निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हिडिओ शुटिंग करीतच रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये सागर हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर सपना ही बेडवर बेशुद्ध आढळून आली. दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या रुममध्ये पोलिसांना कोणत्याही प्रकारची सुसाईट नोट किंवा इतर साहित्य आढळले नाही. दरम्यान, सपना हरवली असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

मोबाईल फ्लाइट मोडवर टाकला
सागर याने अत्महत्या करणाऱ्यापुर्वी मोबाईल फ्लाइट मोडवर टाकला होता. तर सपनाने मोबाईल घरीच ठेवला होता. पोलिसांनी मोबाईलचा फ्लाइट मोड काढल्यानंतर पहिल्या क्रमांकाला फोन केल्यानंतर तो सागरच्या लहान भावाला लागला. त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना माहिती दिली. दोन्ही कुटुंबांनी दोघांचे प्रेमसंबंध असल्याची कल्पना नसल्याची माहिती पोलिसांना दिली. सागर हा बीएच्या दुसऱ्या वर्षात तर सपना १२ वीमध्ये शिक्षण घेत होती.

 

Web Title: Love ends badly; boyfriend-girlfriend commits suicide in lodge, bodies found after 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.