शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एअरगन’चा धाक दाखवून लुटले

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : मागील भांडणाची कुरापत काढत एअरगनचा धाक दाखवून युवकास लूटल्याची खळबळजनक घटना उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली़

उस्मानाबाद : मागील भांडणाची कुरापत काढत एअरगनचा धाक दाखवून युवकास लूटल्याची खळबळजनक घटना उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेतील दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तर इतर दोघे फरार आहेत़पोलिसांनी सांगितले की, शहरातील भानूनगर परिसरात राहणारा पंकज कांतराम पवार (वय-२०) हा सोमवारी रात्री१०़३० वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतून दुचाकीवरून शहराकडे येत होता़ तेरणा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर बाळासाहेब बनसोडे (रा़बार्शी नाका), बापू महादेव कांबळे (रा़दत्तनगर), राहुल राजाभाऊ राठोड (रा़दत्त नगर) व एका अनोळखी इसमाने पवार यास अडविले़ त्यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केी़ राहूल राठोड याने हातातील एअरगनचा धाक दाखविला तर बापू कांबळे याने पवार याच्या खिशातील दीड हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले़ घटनेनंतर पवार यांनी तातडीने शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली़ फिर्याद येताच पोनि रायकर यांच्यासह शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब बनसोडे, बापू कांबळे या दोघांना अटक करून त्यांच्याकडील एअरगन जप्त केली़ अटकेतील दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार दोघांचा शोध सुरू आहे़ प्रकरणाचा अधिक तपास पोनि रायकर हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)