शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

चौकात आता हायटेक कॅमेऱ्यांची नजर

By admin | Updated: August 5, 2016 00:02 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद शहरातील गुन्हेगार व वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

बापू सोळुंके, औरंगाबादशहरातील गुन्हेगार व वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे हाँगकाँगमध्ये बसविण्यात आलेले आहेत. हैदराबादेतील एका कंपनीने स्वखर्चातून शहरातील तीन चौकांत हे कॅमेरे बसविले आहेत.सेफ सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शहरातील प्रमुख चौकांत आणि महत्त्वाच्या ठिकाणी ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यातील सुमारे १२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. वारंवार बंद पडणाऱ्या या कॅमेऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित कंपनीसोबत सतत पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विविध ठिकाणचे सुमारे १२ कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे कार्यान्वित झाल्यापासून आठ महिन्यांत ते एकापाठोपाठ बंद पडत असल्याने या कॅमेऱ्यांच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असताना हैदराबादस्थित एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कंपनीतर्फे शहरातील तीन वेगवेगळ्या चौकांत प्रायोगिक तत्त्वावर २४ आधुनिक कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव सादर केला. आयुक्तांनी या कंपनीला शहरातील महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), मुकुंदवाडी येथील पीव्हीआर वाहतूक सिग्नल, शहानूरमियाँ दर्गा अथवा आकाशवाणी चौक, यापैकी एक याप्रमाणे तीन चौकांत प्रत्येकी आठ कॅमेरे बसविण्यास परवानगी दिली आहे. कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १२ आॅगस्टपर्यंत या कॅमेऱ्यांचे लोकार्पण होईल.