शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 6:22 PM

आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने येथून परतली. 

ठळक मुद्देशहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग तसेच असून, पावसामुळे त्यातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आहे. बुधवारी चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याने भरलेली पालिकेची वाहने परत आली. गुरुवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने परतली. 

नारेगाव-मांडकी कचरा डेपो १३९ दिवसांपासून बंद झाल्यामुळे शहराची कचराकोंडी झाली आहे. हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी आणि पडेगाव या परिसरात कचरा टाकण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे मनपाला माघार घ्यावी लागली. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेत मनपा कचरा आणून टाकत आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया करीत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे, त्यामुळे यापुढे कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. महापौरांसोबत  शहर अभियंता एस. डी. पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

यावेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, नीलेश कावडे, संतोष रिठे, कचरू कावडे, संजय गोटे, नारायण गव्हाणे आदी नागरिकांची उपस्थिती होती. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी निश्चित केलेल्या जागांपैकी हर्सूल व चिकलठाणा येथील जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उभा राहिला. 

मनपासह समितीला अपयश कचऱ्याच्या विल्हेवाटीप्रकरणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यात पालिकेला आणि विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला पूर्णत: अपयश आले आहे. समितीने हळूहळू या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. मनपाला आयुक्त मिळाल्यानंतर समितीने कागदोपत्री बैठका घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत. 

आता रोगराईची भीतीशहरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे तो कचरा आता रोगराईला आमंत्रण देणारा ठरणार आहे. हे सगळे होत असताना पालिकेला १३९ दिवसांत कचरा प्रक्रियेसाठी एक जागा शोधता आलेली नाही. ओला व सुका कचरा विघटन याबाबत जनजागृती करणाऱ्या संस्थाही गायब झाल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchikhalthanaचिखलठाणा