शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनास चारा छावण्यांचा आधार

By admin | Updated: August 21, 2015 00:44 IST

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला. यामुळे जिल्ह्यातील आठ लाख पशुधनास मोठा आधार निर्माण झाला आहे.पावसाने दडी मारल्यानंतर जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले होते. ही संधी असल्याचे काही जणांनी मानत कडबा दुपटीने विक्री करण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी कडब्याचे दर १४०० रूपये शेकडा होते तर त्यानंतरच्या १५ दिवसांच्या कालावधीत हे दर जवळपास अडीच ते तीन हजारांवर जाऊन पोहोचले होते. यामुळे पशूधन वाचविणे शेतकऱ्यांना मोठे अवघड बनले होते. वाळला चारा महाग असल्यामुळे जनावरांना ओला चारा दिला जात होता. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आपला अहवाल सादर केला होता. जनावरांच्या छावणीत किमान ५०० व कमाल तीन हजार जनावरे ठेवण्यात येतील. त्यामुळे पशुपालकांना आता छावणीत मुक्काम करावा लागणार आहे.वेळोवेळीच्या परिस्थितीचे आकलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चारा छावणीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक जनावरांच्या मालकांना त्यांच्याकडे असलेल्या जास्तीत जास्त पाच जनावरांपर्यंत (लहान व मोठे) मर्यादीत असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ यांच्यासारख्या संस्थामार्फत गुरांच्या छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजपचे भाई गंगाभीषण थावरे यांनी चारा डेपो, छावण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतपुढे गुरे बांधून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ आॅगस्ट रोजी माजलगाव तहसीलने बैठक बोलावली होती. आता ही बैठक २२ रोजी होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरे आहेत. मोठ्या गुरांची संख्या ५ लाख ९६ हजार ७०७ तर लहान गुरांची संख्या २ लाख २५ हजार ६५७ एवढी आहे. या गुरांना दररोज ४२५७ मेट्रीक टन चारा आवश्यक आहे. चारा संपल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे फड गुत्ते घेऊन उसासह वाढे दावणीत टाकणे सुरू केले होते. त्यामुळे उसालाही चांगला भाव आला होता. पशुपालक मात्र मेटाकुटीला आले होते. छावण्यांनी दिलासा मिळणार आहे.