शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्तेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:32 AM

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारणसह विद्याशाखेनुसार ९ प्रकारचे वर्गीकरण केले होते. मराठवाड्यात ७५० हून अधिक महाविद्यालये असताना फक्त ८९ महाविद्यालयांनी या गुणवत्ता यादीमध्ये सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय गुणवत्ता यादी : नऊ प्रकारांत ८९ संस्थांनी घेतला सहभाग; केवळ एका महाविद्यालयाला मिळाले स्थान

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारणसह विद्याशाखेनुसार ९ प्रकारचे वर्गीकरण केले होते. मराठवाड्यात ७५० हून अधिक महाविद्यालये असताना फक्त ८९ महाविद्यालयांनी या गुणवत्ता यादीमध्ये सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात केवळ औषधनिर्माण प्रकारात औरंगाबादच्या वाय.बी. चव्हाण औषधनिर्माण महाविद्यालयाला देशात ३४ वे स्थान मिळाले आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय मागील तीन वर्षांपासून उच्च शिक्षण देणाºया संस्थांची गुणवत्ता यादी जाहीर करीत आहे. मागील वर्षी या प्रक्रियेवर शंका घेतल्यामुळे यावर्षी विशेष खबरदारी घेतली आहे. मराठवाड्यात औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, एमजीएम वैद्यकीय अभिमत विद्यापीठ, मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टचे इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट ही विद्यापीठे आहेत. यातील दोन विद्यापीठे राज्य सरकारने स्थापन केलेली आहे, तर उर्वरित दोन विद्यापीठे अभिमत आहेत. विद्यापीठांशी मराठवाड्यात ७५० पेक्षा अधिक महाविद्यालये संलग्न आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहेत. या सर्व संलग्न महाविद्यालय आणि विद्यापीठ मिळून केवळ ८९ शैक्षणिक संस्थांनीच राष्ट्रीय गुणवत्ता स्पर्धेत भाग घेतला आहे. सर्वसाधारण, विद्यापीठ, विधि, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्ट, व्यवस्थापन आणि महाविद्यालय या नऊ गटांत केवळ एका महाविद्यालयाला क्रमांक मिळाला आहे. औषधनिर्माण गटात रफिक झकेरिया कॅम्पसमधील वाय. बी. चव्हाण औषधनिर्माण महाविद्यालयाने देशात ३४ वा क्रमांक पटकावला. मात्र, मागील वर्षी हेच महाविद्यालय २४ व्या स्थानावर होते. त्याची १० क्रमांकाने घसरण झाली आहे, हे विशेष. याशिवाय विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालये, पारंपरिक महाविद्यालयांना कोठेही स्थान मिळालेले नाही.वाय. बी. चव्हाण औषधनिर्माणमहाविद्यालयाने राखली लाजमराठवाड्यातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालयाला एकूण नऊ प्रकारांमध्ये कोठेही स्थान मिळाले नाही. यास अपवाद ठरले केवळ औरंगाबादचे वाय. बी. चव्हाण औषधनिर्माण महाविद्यालय. या महाविद्यालयाला औषधनिर्माण गटात देशात ३४ वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय याच प्रकारात शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, औरंगाबाद आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज आॅफ फार्मसी या दोन महाविद्यालयांना क्रमांक मिळाला नाही. मात्र, त्यांचा समावेश ७५ ते १०० या गटांत झाला आहे. महाविद्यालय प्रकारात औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा समावेश १५१ ते २०० गटांत आहे, तर विद्यापीठ प्रकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश १०१ ते १५० या गटात आहे. उर्वरित सर्वसाधारण, अभियांत्रिकी, विधि, अर्किटेक्चर, वैद्यकीय आणि व्यवस्थापन प्रकारात एकाही संस्थेला क्रमांक आणि गटातही स्थान मिळाले नाही.मराठवाड्यातील सहभागी संस्थांची आकडेवारीप्रकार एकूण संस्था मराठवाडासर्वसाधारण ९५७ २४विद्यापीठे —— ०२अभियांत्रिकी ९०६ १३महाविद्यालय १,०८७ ४३व्यवस्थापन ४८७ ०६औषधनिर्माण २८६ ०७विधि ७१ ०२अर्किटेक्चर ५९ ०१वैद्यकीय १०१ ००एकूण ३,९५४ ९८