शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव तालुक्यात बिबट्या पडला विहिरीत

By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST

सोयगाव : तालुक्यातील नांदगाव येथील एका शेतातील विहिरीमध्ये शिकारीचा पाठलाग करणारा बिबट्या पडला

सोयगाव : तालुक्यातील नांदगाव येथील एका शेतातील विहिरीमध्ये शिकारीचा पाठलाग करणारा बिबट्या पडला. गुरुवारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्यास शुक्रवारी वनविभागाच्या पथकाने दिवसभर परिश्रम घेऊन सुखरूप बाहेर काढले. बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झालेली होती.नांदगाव येथील शेतकरी गुरुमुख राठोड यांच्या कलकत्ता शिवारात गट क्र. ११ मधील विहिरीत गुरुवारी रात्री शिकारीच्या मागे लागलेला बिबट्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये पडला. सकाळी ६ वाजता शेतकरी गुरुमुख राठोड पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीजवळील पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत जिवंत बिबट्या दिसला. भयभीत झालेले गुरुमुख राठोड यांनी गावात जाऊन सरपंच नरेंद्र पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी पोलीस व वनविभागाला माहिती कळविली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन. गायकवाड यांना माहिती दिली. त्यांनी उपवनरक्षक एस.डी. भोसले यांना कळविले.उपवनरक्षक एस.डी. भोसले, व्ही.एस. गायकवाड, एस.वाय. गवंडर, एम.के. राठोड, सुरडकर, सी.यू. साबळे, के.जी. जाधव, एच.के. वाघ, व्ही.पी. शेजवळ, आर.एल. भडके, कृष्णा महाकाळ, आर.पी. झोंड, सुखदेव दांडगे, मुकेश गुप्ता, कडू इंगळे आदी वनकर्मचारी, पोलीस जमादार मोरे, सुलाने, शैलेश राज, फकिरा तडवी आदींनी सहकार्य केले. या बिबट्याला उपचारासाठी नंतर औरंगाबादला हलविण्यात आले.